घरताज्या घडामोडीभंडारा दुर्घटना Live Updates: भंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हलवले

भंडारा दुर्घटना Live Updates: भंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हलवले

Subscribe

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डात लागलेल्या अचानक आगीत १७ नवजात शिशूंपैकी ७ शिशूंना वैद्यकीय चमू व अग्निशमन विभागाच्या चमूंनी तात्काळ बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले. परंतु या दुर्घटनेत १० शिशू मृत पावले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डात (एसएनसीयु) येथे रात्रो उशिरा आग लागली. भंडारा नगर परिषद, सुरक्षा कर्मचारी व पोलीस पथकांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासोबतच ती इतरत्र पसरु नये यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आग पूर्णत: विझविण्यात आलेली असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डात १७ नवजात शिशू दाखल झाले. त्यापैकी १० शिशू मृत झाले असून त्यांच्या मातांची नावे याप्रमाणे, १) आईचे नाव – हिरकन्या हिरालाल भानारकर (मृतबालक-स्त्री) रा. उसगाव (साकोली), २) आईचे नाव – प्रियंका जयंत बसेशंकर (मृतबालक-स्त्री) रा. जांब (मोहाडी), ३) आईचे नाव – योगिता विकेश धुळसे (मृतबालक-पुरुष) रा. श्रीनगर पहेला (भंडारा), ४) आईचे नाव – सुषमा पंढरी भंडारी (मृतबालक-स्त्री) रा. मोरगाव अर्जुनी (गोंदिया), ५) आईचे नाव – गिता विश्वनाथ बेहरे (मृतबालक-स्त्री) रा. भोजापूर (भंडारा), ६) आईचे नाव- दुर्गा विशाल रहांगडाले (मृतबालक-स्त्री) रा. टाकला (मोहाडी), ७) आईचे नाव – सुकेशनी धर्मपाल आगरे (मृतबालक-स्त्री) रा. उसरला (मोहाडी), ८) आईचे नाव – कविता बारेलाल कुंभारे (मृतबालक-स्त्री) रा. सितेसारा आलेसूर (तुमसर), १०) आईचे नाव – वंदना मोहन सिडाम (मृतबालक-स्त्री) रा.रावणवाडी (भंडारा), ११) अज्ञात (मृतबालक-पुरुष).
संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नऊ शिशूंचे मृतदेह संबंधित नातेवाईकांकडे सोपविण्यात आले आहेत. सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या बालकांमध्ये एका जुळ्यांचा समावेश आहे. यामध्ये १) आईचे नाव – शामकला शेंडे (बालक-स्त्री), २) आईचे नाव – दीक्षा दिनेश खंडाते (बालक – स्त्री (जुळे), ३) आईचे नाव – अंजना युवराज भोंडे (बालक-स्त्री), 4 – आईचे नाव – चेतना चाचेरे (बालक-स्त्री), 5 – आईचे नाव – करीश्मा कन्हैया मेश्राम (बालक-स्त्री), 6 – आईचे नाव – सोनू मनोज मारबते (बालक-स्त्री).
बालकांच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीसंदर्भातील प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्तीव्यवस्थपन प्राधिकरणाचे अध्यक्ष संदीप कदम यांनी सादर केला आहे.


भंडारा जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये १० निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू हा प्रशासनच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. ही हत्या आहे. त्याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे, अशी टीका भाजप नेते राम कदम यांनी केली आहे.

- Advertisement -

ही दुर्घटना अत्यंत भीषण असून, आगीत वाचलेल्या ७ बालकांसाठी तातडीने दुसरे नवजात शिशु केअर सेंटर सुरू करून त्यांच्यावर तिथे उपचार करण्यात आले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप सांगता येऊ शकत नाही. त्यासाठी तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून, दोन ते तीन तासांमध्ये आगीचे नेमके कारण समजू शकते.
– संदीप कदम, जिल्हाधिकारी, भंडारा


भंडाऱ्यातील दुर्घटनात अतिशय दुर्दैवी असून दुःख भरुन निघणारं नाही. या संदर्भात सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तात्काळ दखल घेऊन दोषींवर कारवाई केली जाणार आहे, असे राज्याचे वनमंत्री आणि भंडारा जिल्ह्याचे संपर्कमंत्री संजय राठोड यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


मृत नवजात बालकांची नावं

१) हिरण्या हिरालाल भांडारकर

२) योगिता विवेक गोडसे,
३) सुषमा भंडारी,
४) प्रियंका बसेशंकर,
५) गीता विश्वनाथ बेहरे,
६) कविता बळीलाल कुंभरे,
७) दुर्गा विशाल राहंगडाले,
८) वंदना मोहन सिडांम,
९) सुरक्षिणी धर्मपाल आगरे,
१०) एक अनोळखी शिशु


सर्व रुग्णालयातील शिशु केअर युनिटचे तात्काळ ऑडिट करा; अजित पवार यांचे निर्देश

भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग लागून झालेल्या बालकांचा मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशु केअर युनिटचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी आपण चर्चा केली असून रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरु ठेवण्याचे तसेच अन्य बालकांवरील उपचार तज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

 


ज्या कुटुंबांतील मुलांचा या घटनेत मृत्यू झाला त्यांच्या दु:खात मी सहभागी – नितीन गडकरी

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि मन हेलावणारी आहे. ज्या कुटुंबांतील मुलांचा या घटनेत मृत्यू झाला त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना, असं नितीन गडकरी यांनी ट्वीट केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -