Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update: गोव्यात २४ तासांत २७०३ नव्या रुग्णांची वाढ, ४६ जणांचा मृत्यू

Live Update: गोव्यात २४ तासांत २७०३ नव्या रुग्णांची वाढ, ४६ जणांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

गोव्यात गेल्या २४ तासांत २ हजार ७०३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ४६ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. तर १ हजार ४२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या गोव्यात २५ हजार ८३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १ हजार ३२० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.


- Advertisement -

मध्यप्रदेशमध्ये ५ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली.


- Advertisement -

१ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाला १२ राज्यांनी सुरुवात केली, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालय सचिव लव्ह अग्रवाल यांनी दिली.


बिहारनंतर पश्चिम बंगालमध्ये पत्रकारांना कोविड वॉरियर म्हणून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घोषित केले.


देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेडिकल स्टाफची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सध्या ही NEET-PG Exam किमान ४ महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.


चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या राजीव मसंद यांना काही दिवसांपूर्वी मुंबई अंधेरीतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, “आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या राजीव मसंद यांची प्रकृती नाजूक आहे.


देशात गेल्या २४ तासात ३ लाख ६८ हजार १४७ इतक्या नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच ३ हजारांहून अधिकांचा गेल्या दिवसभरात कोरोनाने बळी गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ३ लाखांहून अधिकांनी कोरोनावर मात केली आहे. (सविस्तर वाचा)


IPL मधील कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामना रद्द करण्यात आला आहे. कोलकाता संघातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरिअर या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. तर संघातील इतर खेळाडूंना क्वारंटाईन करण्यात आले आहेत.


कोरोनाचा वाढता धोका आणि ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा लक्षात घेता नागरिकांना ऑक्सिजन सहज उपलब्ध व्हावा यासाठी डोंबिवलीत मनसे तर्फे गरजूंना मोफत पोर्टेबल स्प्रे ऑक्सिजन सिलेंडरची सुविधा देऊ केली आहे. सहज हाताळता येण्यासारखा ऑक्सिजन सिलेंडर फक्त कोविड रुग्णांसाठी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.


रेल्वेकडून देशभरात साधारण ४ हजार आयसोलेशन कोचसह ६४ हजार बेड्स तैनात


चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमधील कोल हँडलिंग प्लांटला मोठी आग लागली. ही आग रविवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास लागली. ८ व ९ क्रमांकाच्या कन्व्हेअर बेल्ट ला ही आग लागली आहे. ७ व ८ क्रमांकाच्या बॉयलर जवळ शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली अशी माहिती मिळाली आहे. या आगीमुळे प्लांटचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन विभागाच्या ४ गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याचे सांगितले जात आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोव्यात कठोर निर्बंध लादण्यात येणार आहे. पुढच्या सोमवारपर्यंत गोव्यात काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांमध्ये कसिनो, शाळा, साप्ताहिक बाजारपेठा बंद असणार आहेत, तर मासळी बाजारही केवळ संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरु असणार आहेत. याव्यतिरिक्त बारदेखील बंद ठेवण्यात येणार आहेत. तर रेस्टॉरंट्स ५० टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्यात येणार आहेत. त्याचसोबत धार्मिक स्थळांवर जाण्यासही परवानगी नसणार आहेत. स्पा, सलून, सिनेमागृह काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

- Advertisement -