घरताज्या घडामोडीLive Update: छत्तीसगढमध्ये २४ तासांत १५,७८४ नवी रुग्णवाढ, २१० जणांचा मृत्यू

Live Update: छत्तीसगढमध्ये २४ तासांत १५,७८४ नवी रुग्णवाढ, २१० जणांचा मृत्यू

Subscribe

छत्तीसगढमध्ये गेल्या २४ तासांत १५ हजार ७८५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २१० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

- Advertisement -

उद्या मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात निकालाची शक्यता आहे. सकाळी साडेदहा वाजता मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सुनावणीला सुरुवात होणार आहे.


गेल्या २४ तासांत राज्यात ५१ हजार ८८० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ८९१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४८ लाख २२ हजार ९०२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ७१ हजार ७४२ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा

- Advertisement -


मुंबईत गेल्या २४ तासांत २ हजार ५५४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ हजार २४० रुग्ण बरे होऊन गेले आहेत. मुंबईत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६ लाख ६१ हजार ४२०वर पोहोचली आहे. सध्या ५१ हजार ३८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सविस्तर वाचा 


गोव्यात गेल्या २४ तासांत २ हजार ८१४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १ हजार ८७० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. सध्या गोव्यात २६ हजार ७३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


कर्नाटक सरकारने पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित केले.


आज बिहारमध्ये लॉकडाऊन लागू केला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सर्व संबंधित लोकांसोबत चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.


देशभर कोरोनाचा कहर सुरू असताना आता IPL सामन्यांवर देखील कोरोनाने सावट आलं आहे. याच पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सुरु असलेली आयपीएल 2021 ची स्पर्धा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली.


गोकुळ निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर. सतेज पाटील गटाच्या सुजित मिनचेकर यांचा ३४६ मतांनी तर अमर पाटील यांचा ४३६ मतांनी विजय झाला आहे.


दिलासादायक! देशात गेल्या २४ तासात ३ लाख २० हजारांहून अधिकांनी केली कोरोनावर मात

देशात ३ लाख ५७ हजार २२९ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली तर ३, ४४९ जणांचा कोरोनाने बळी गेल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. तर दिलासादायक म्हणजे ३ लाख २० हजार २८९ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. (सविस्तर वाचा)


मुंबईत आजपासून ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु. ज्येष्ठ नागरिक आणि लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य मिळणार


मुलुंड पश्चिमेकडील आशानगर परिसरात असलेल्या मिनर्वा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये मध्यरात्री साडे अकराच्या सुमारास इलेक्ट्रॉनिकच्या एका गाळ्यामध्ये मोठी आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तीन तासांनी या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. या आगीमध्ये ६ ते ७ गाळे जळून खाक झाले आहेत. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तर गाळ्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती मिळतेय.


पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी ९ वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे साधारण दीड वर्ष रखडलेल्या गोकुळच्या या निवडणुकीसाठी २ मे रोजी मतदान पार पडलं. एकूण ३ हजार ५४७ मतदार असलेल्या या गोकुळ दूध संघात ९९.७८  टक्के इतकं मतदान पार पडलं होतं. प्रतिष्ठेच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल काय लागणार हे संध्याकाळपर्यंत होणार स्पष्ट


जम्मू-काश्मीरचे माजी गव्हर्नर जगमोहन यांचे सोमवारी दिल्लीत निधन


पुण्याकडे जाणाऱ्या ट्रकला अपघात होऊन ट्रक चालकाला प्राण गमवावे लागले. ब्रेक पॅडलखाली पाण्याची बाटली अडकल्यामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खोपोली जवळ सोमवारी दुपारच्या वेळी हा अपघात झाला. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याकडे जाण्याच्या दिशेला बोरघाटात अंडा पॉईंटजवळ ट्रकला अपघात झाला. अपघातात ट्रक चालक दीपक वाघमारे (रा. लोणीकंद) याचा जागीच मृत्यू झाला.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -