घरक्राइमWorm In Dairy Milk : कॅडबरी डेअरी मिल्कमध्ये जिवंत अळी? व्हायरल व्हिडीओनंतर...

Worm In Dairy Milk : कॅडबरी डेअरी मिल्कमध्ये जिवंत अळी? व्हायरल व्हिडीओनंतर कंपनीचं स्पष्टीकरण

Subscribe

हैदराबाद : ‘कुछ मिठा हो जाये’ म्हणत कॅडबरी खाणारे काही कमी नाहीत. त्यातही कित्येक प्रकारच्या कॅडबऱ्या आल्या असल्या तरी आजही चॉकोलेट किंवा कॅडबरी म्हटलं की डेअरी मिल्कच आठवते. आजही कॅडबरी डेअरी मिल्क सगळ्यांचीच आवडती आहे. मात्र, याच कॅडबरीमध्ये अळी सापडल्याची तक्रार एका ग्राहकाने सोशल मीडियावर केली आहे. याचा व्हिडीओ देखील त्याने पोस्ट केला आहे.

हेही वाचा – Fadnavis On Raut : कोण संजय राऊत ? देवेंद्र फडणवीसांचा थेट सवाल

- Advertisement -

रॉबिन झॅकियस नावाच्या व्यक्तीने सोशल मिडीया एक्सवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली असून डेअरी मिल्कच्या गुणवत्तेवर काही युजर्स प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. हैदराबादच्या अमीरपेटमधील रत्नदीप मेट्रोमध्ये ही घटना घडल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. “अमीनपेटमधील रत्नदीप मेट्रोमधून मी खरेदी केलेल्या कॅडबरी चॉकलेटमध्ये एक जिवंत अळी सापडली आहे. एक्स्पायरी डेट जवळ आलेल्या उत्पादनांची तपासणी करण्यासाठी कोणती यंत्रणा आहे का? आरोग्यासंदर्भातील या अक्षम्य हलगर्जीपणासाठी कोण जबाबदार आहे?” असा प्रश्न रॉबिन यांनी उपस्थित केला आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे?

रॉबिन झॅकियस यांनी आपल्या पोस्टसोबत एक व्हिडीओही शेअर केला आहे. त्यात अर्धवट फोडलेल्या या कॅडबरीच्या मागच्या बाजूस वळवळणारी जिवंत अळी दिसत आहे. या व्हिडीओसोबत खरेदीचं बिलही देण्यात आलं असून त्यात ९ फेब्रुवारी रोजी ही कॅडबरी रत्नदीप रिटेल शॉपमधून खरेदी केल्याचं दिसत आहे.

- Advertisement -

कॅडबरी डेअरी मिल्कचं उत्तर

रॉबिनने केलेल्या पोस्टवर कॅडबरी डेअरी मिल्कने उत्तर दिलं आहे. उत्तर देताना त्यांनी म्हटलं आहे की, “नमस्कार. मंडेलेज इंडिया फूड प्रायव्हेट लिमिटेड (आधीचं कॅडबरी इंडिया लिमिटेड) कायमच उत्पादनांचा उच्च दर्जा राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. तुम्हाला आलेल्या वाईट अनुभवासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी कृपया तुमची तक्रार [email protected] वर पाठवा. त्यासोबत तुमचं संपूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर आणि खरेदीची केलेली माहिती द्या”, असं उत्तर कंपनीकडून संबंधित ग्राहकाला देण्यात आलं आहे.

हेही वाचा – Bihar News: तेजस्वी यादव यांच्या घरी 76 आरजेडी आमदार नजरकैदेत; लालू यादव यांच्या पक्षातून ‘हे’ आमदार बेपत्ता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -