घरदेश-विदेशराम मंदिर उभारण्यासाठी चिराग पासवान यांनी दिले १ लाख ११ हजार रूपये;...

राम मंदिर उभारण्यासाठी चिराग पासवान यांनी दिले १ लाख ११ हजार रूपये; म्हणाले…

Subscribe

लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी स्वत: ला शबरीचे वंशज म्हणून संबोधले

लोक जनशक्ती पक्षाचे (LJP) राष्ट्रीय अध्यक्ष आणि जमुई लोकसभा मतदारसंघातील खासदार चिराग पासवान यांनी अयोध्येत उभारणाऱ्या राम मंदिर बांधण्यासाठी १ लाख ११ हजार रुपयांची देणगी दिली आहे. चिराग पासवान यांच्या हस्ते शनिवारी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या अधिकाऱ्यांकडे १ लाख ११ हजार रुपयांच्या देणगीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यासह राम मंदिरासाठी देणगी देणारा चिराग बिहारचा दुसरा भाजपा खासदार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी स्वत: ला शबरीचे वंशज म्हणून संबोधले आहे. आपल्या कुटुंबाला राम यांच्याशी जोडत पक्षप्रमुखांनी अयोध्येत मंदिर बांधण्यासाठी १ लाख ११ हजार रुपये देणगी दिली आहे. शनिवारी राम यांचे नाव घेताना चिराग पासवान म्हणाले, “मंदिर बांधकामाच्या या शुभ कामात भाग घेणे हे समाजातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.”

- Advertisement -

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आजच्या समाजातही श्रीराम आणि आई शबरी यांच्यातील स्नेहाचे नाते समजून घेतले पाहिजे. वंचित समाजातील सर्व बांधवांना प्रेमाची आणि सन्मानाची गरज आहे, जेणेकरून सामाजिक प्रेम नेहमी श्री राम आणि आई शबरीसारखेच राहिले पाहिजे. मला माता शबरीचा वंशज असल्याचा मला अभिमान आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Chirag Paswan (@ichiragpaswan)

- Advertisement -

राम मंदिर बांधण्यासाठी योगदान देणारे चिराग पासवान बिहारचे दुसरे भाजपा खासदार आहेत. चिराग पासवान यांच्या आधी जनता दल युनायटेड (जेडीयू) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार आरसीपी सिंह यांनीही त्यांच्या वतीने राम मंदिर बांधण्यासाठी १ लाख ११ हजार १११ रुपयांची देणगी दिली होती.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -