घरदेश-विदेशस्थानिक गँगस्टर्सवर भारतात दहशतवादी कारवायांची जबाबदारी

स्थानिक गँगस्टर्सवर भारतात दहशतवादी कारवायांची जबाबदारी

Subscribe

भारतीय सुरक्षा संस्थांबरोबरच गुप्तचर संस्थांसमोर गुन्हेगारी व दहशतवादाचे एक नवे रुप आले आहे. भारतीय सैन्य व गुप्तचर संस्थांच्या सर्तकतेमुळे पाकिस्तान, आयएसआय व दहशतवादी संघटनांना आपल्या कारवाया करण्यात अपयश येत आहे. यामुळे आता आयएसआय व दहशतवादी संघटनांनी भारतातील गुन्हेगारी जगताचा यासाठी वापर करणे सुरू केले आहे. देशात दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी आता स्थानिक गँगस्टर्सवर जबाबदारी सोपवली जात असल्याचे दिसून येत आहे.

अशातच चंदीगडच्या गुप्तचर संस्थेने देशभरातील सर्व गुप्तचर संस्थांना दहशतवाद्यांची देशातील गँगस्टर्सशी हात मिळवणी व स्थानिक गुन्हेगारी जगताशी असलेल्या संबंधाबाबत सतर्क केले आहे. एवढेच नाहीतर काही गँगस्टर्सची नावे देऊन, इंटेलिजन्स विंगने अन्य प्रमुख संस्थांना देखील सतर्क केले आहे. आयएसआय व दहशतवादी संघटना या गँगस्टर्सच्या संपर्कात आहेत व त्यांना भारतात हल्ला घडवण्याची जबाबदारी सोपवली आहे. यातील काही गँगस्टर्स फरार आहेत तर काही तुरुंगात आहेत.

- Advertisement -

एका वरिष्ठ अधिकार्‍याने दावा केला आहे की, अशी शक्यता आहे की आयएसआय या स्थानिक परंतु अत्यंत खतरनाक गँगस्टर्सशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू शकते किंवा त्यांच्या संपर्कात आहे. काही दिवसांअगोदर केंद्रीय गुप्तचर संस्थेच्या पंजाब युनिटने अलर्ट केले होते की, आयाएसआय आणि अन्य दहशतवादी संघटनांनी काही नेत्यांना निशाणा बनवण्यासाठी पाच गुंडांना काम सोपवले होते. सध्या या पाच पैकी दोघे फरार आहेत आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहे. तर उर्वरित तिघे पंजाबमधील विविध तुरुंगात आहेत. हे गँगस्टर्स अनेक हत्या, लुटमार, अंमली पदार्थांच्या प्रकरणांमध्ये तुरुंगातून रॅकेट चालवण्यात सहभागी आहेत. स्थानिक पोलिसांना त्यांच्यावर नजर ठेवण्यास सांगण्यात आलेले आहे.

एका अधिकार्‍याने सांगितल्याप्रमाणे, या रणनीती मागे हे कारण आहे की, आयएसआयचा कणा समजल्या जाणार्‍या स्लीपर सेल जवळपास संपुष्टात आल्या आहेत किंवा काम करण्यास धजावत नसल्याचे दिसत आहे. कारण, भारतीय लष्कराकडून सुरू असलेल्या कारवायांमध्ये मारले जाण्याची त्यांना भीती आहे. याशिवाय स्थानिक स्लीपर सेलवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता क्वचितच कुणी प्रमुख कमांडर उरला आहे. अशावेळी स्थानिक गँगस्टर्स सहज दहशतवादी कारवायासाठी शस्त्र जमा करू शकतात व हल्ला देखील घडवू शकतात. म्हणूनच आता आयएसआय व दहशतवादी संघटनांनी त्यांच्याकडे मोर्चा वळवल्याचे दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -