घरताज्या घडामोडीBulldozer in Shaheen Bagh: दिल्लीच्या शाहीन बागमधील बुलडोझरच्या कारवाईवर स्थानिकांचा संताप; प्रकरण...

Bulldozer in Shaheen Bagh: दिल्लीच्या शाहीन बागमधील बुलडोझरच्या कारवाईवर स्थानिकांचा संताप; प्रकरण कोर्टात

Subscribe

नवी दिल्लीतील शाहीनबागेत ज्या नागरिकत्व कायद्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले होते. त्याच शाहीनबागमध्ये आता पुन्हा एकदा आंदोलनाची सुरूवात झाली आहे. यावेळी हे आंदोलन अतिक्रमणाविरोधात कारवाई करणाऱ्या दक्षिण दिल्ली महापालिकेविरूद्ध सुरू आहे. ही कारवाई करण्यासाठी महापालिकेचे एक पथक सकाळी बुलडोझरसह पोहाचले होते. परंतु स्थानिकांनी त्याला तीव्र विरोध केला.

ही कारवाई सुरू असताना अनेक स्थानिकांनी स्वत: हून त्यांची तात्पुरती बांधकामे हटवली आहेत. आम आदमी पक्षाचे स्थानिक आमदार अमानतुल्ला खान यांनी देखील मार्केट असोसिएशनची समन्वय साधून तात्पुरती बांधकामे हटवण्यास सहमती दर्शवली आहे.

- Advertisement -

काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील अतिक्रमण हटविण्यास विरोध केला. मात्र, आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी तेथून हटवले. महिलांसह मोठ्या संस्थेने स्थानिक लोकांनीही एमसीडीच्या कारवाईला विरोध केला आणि लोक बुलडोझरसमोर बसले. अमानतुल्ला खान हे देखील अतिक्रमण हटाव कारवाईचा निषेध करण्यासाठी पक्षीय फौजफाट्यासह तेथे पोहोचले. अतिक्रमण हटवण्याच्या बहाण्याने भाजप राजकारण करत असल्याचा आरोप अमानतुल्ला खान यांनी केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी देखील दिल्लीतील जहांगीरपुरीत देखील अशाच प्रकारची मोठी कारवाई करण्यात आली होती. यावेळी सुद्धा दिल्ली महापालिकेकडून अवैध बांधकाम तोडण्यासाठी आदेश देण्यात आले होते. मात्र, सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयानंतर हे बांधकाम पाडण्याचे काम थांबवण्यात आलं होतं. एसडीएमसी दक्षिण दिल्लीतील अनेक भागांमध्ये ४ मे ते १३ मे या कालावधीत बेकायदा बांधकामे पाडण्याची मोहीम सुरू करणार आहे, असं दक्षिण कॉर्पोरेशनमधील स्थायी समितीचे उपाध्यक्ष राजपाल सिंह यांनी सांगितले होते.


हेही वाचा : Indigo Flight : इंडिगो विमानात दिव्यांग मुलाला प्रवास करण्यापासून रोखलं, विमान मंत्री सिंधियानी दिले चौकशीचे आदेश


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -