घरताज्या घडामोडीपाच राज्यात दारुची रेकॉर्ड ब्रेक विक्री; ५५४ कोटींची कमाई

पाच राज्यात दारुची रेकॉर्ड ब्रेक विक्री; ५५४ कोटींची कमाई

Subscribe

लॉकडाऊन ३.० च्या पहिल्या दिवशी एकूण ७३६ जिल्ह्यांपैकी ६०० जिल्ह्यात दुकानं उघडली. तथापि, सर्वाधिक गर्दी दारूच्या दुकानांवर होती.

गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोमवारी दारूची दुकाने उघडण्यात आली. सकाळपासूनच लोक दारुच्या दुकानाबाहेर जमायला लागले. पहिल्याच दिवशी पाच राज्यात पाच कोटी रुपयांची दारू विकली गेली. दारूविषयी लोकांमध्ये खूप उत्साह होता हे यावरुन दिसून येतं.

लॉकडाऊन ३.० च्या पहिल्या दिवशी एकूण ७३६ जिल्ह्यांपैकी ६०० जिल्ह्यात दुकानं उघडली. तथापि, सर्वाधिक गर्दी दारूच्या दुकानांवर होती. काही शहरांमध्ये दोन किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या. उत्तर प्रदेशात २२५ कोटी, महाराष्ट्रात २०० कोटी, राजस्थानमधील ५९ कोटी, कर्नाटकमध्ये ४५ कोटी आणि छत्तीसगडमध्ये २५ कोटी रुपयांची दारुची विक्री झाली.

- Advertisement -

दिल्लीत दारूच्या किंमतीत ७० टक्क्यांनी वाढ

दिल्ली सरकारने सोमवारी रात्री मोठा निर्णय घेत दारूच्या किंमतीत ७० टक्क्यांनी वाढ केली आहे. दिल्ली सरकारने ‘स्पेशल कोरोना फी’ अंतर्गत हा कर वाढवला आहे. मंगळवारपासून म्हणजेच आजपासून वाढीव दर लागू होतील. दिल्ली सरकारने एमआरपीवर ७० टक्के कर जाहीर केला आहे.


हेही वाचा – या राज्यात दारु झाली महाग; ७० टक्के कोरोना टॅक्स आकारणार

- Advertisement -

दिल्लीत दारुची दुकानं सकाळी ९ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत खुले राहतील. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकांना कायद्याचं अनुसरण करण्याचं आवाहन केलं आहे जेणेकरुन दिल्लीत औद्योगिक व्यवसाय हळूहळू उघडता येतील. ते म्हणाले की जर लोकांनी नियमांचे पालन केलं नाही तर सूट मागे घेतली जाईल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -