लॉकडाऊन- एटीएम बंद, घरबसल्या बँक देणार पैसे

करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यादरम्यान कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. पण त्यातही सूट देण्यात आली आहे. त्यात मेडीकल, डॉक्टर, किराणा सामान अशा अत्यावश्यक सेवांचा सहभाग आहे. पण यासगळ्यांमध्ये पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये कसे जायचे असा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण देशातील काही बँका अटी शर्थींवर तुमचेच पैसे तुम्हाला घरपोच आणून देणार आहेत. जेणेकरून तुम्हांला घराबाहेर पडण्याची गरज नसणार आहे.

देशातील अनेक बँका काही अटी व अपवादात्मक परिस्थितीत दिव्यांग व विशेष अधिकाऱ्यांच्या घरी येऊन पैसे देतात. पण आपल्याकडे याबद्दल कोणाला फारशी माहिती नाहीये. मात्र या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुमचे स्व;तचे बँक खाते त्या संबंधित बँकेत असणे गरजेचे आहे. यात प्रामुख्याने एसबीआय व्यतिरिक्त अनेक खासगी बँकांचाही समावेश आहे. एसबीआयचे खाते असेल तर एसबीआय डोअर स्टेप डिलिव्हरी अंतर्गत तुम्ही बँकेकडे रोख रक्कम पाठवण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी विचारणा करू शकता. [email protected] या लिंकवर क्लिक केल््यावर तुम्हांला बँका देत असलेल्या सेवांबदद्ल कळणार आहे. सध्या आपल्याकडे दिव्यांग व सिनियर सिटीजन आणि काही अपवादात्मक घटनांमध्ये घरपोच पैसे ेदण्याची तरतूद आहे. एक्सिस बँकेनेही आता ही डोअर स्टेप पैसे देण्याची सेवा सुरू केली आहे. या्ंतर्गत कुठलीही बँक तुम्हाला २५ हजार रुपये देऊ शकते. पण त्यासाठी तुमच्या खात्यात तेवढी रक्कम असणेही गरजेचे आहे. तसेच अनेक बँका आता घरबसल्या लोन देण्याचीही सेवा करत आहे.