घरCORONA UPDATELockdown: सूरतच्या वस्त्रोद्योगाचं ५०० ते ६०० कोटींचं नुकसान

Lockdown: सूरतच्या वस्त्रोद्योगाचं ५०० ते ६०० कोटींचं नुकसान

Subscribe

सुरत परिसरातील सचिन औद्योगिक क्षेत्रात सुमारे २२५० औद्योगिक कंपन्या कार्यरत आहेत. परंतु लॉकडाऊनमुळे येथे सर्व कंपन्या बंद आहेत.

गुजरातची आर्थिक राजधानी असलेल्या सूरतच्या वस्त्रोद्योगाला लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसला आहे. सूरत येथील गिरणीत काम करणाऱ्या कामगारांची अवस्था बिकट झाली आहे. त्याचबरोबर उद्योगातील मालकांनाही कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. सूरत शहरातील हजारो वस्त्रोद्योगांपैकी काही उद्योग सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. सुरत परिसरातील सचिन औद्योगिक क्षेत्रात सुमारे २२५० औद्योगिक कंपन्या कार्यरत आहेत. परंतु लॉकडाऊनमुळे येथे सर्व कंपन्या बंद आहेत. काम करणारे मजूर रोखण्यासाठी उद्योजक येथे स्वयंपाकघरही चालवत आहेत. लॉकडाऊननंतर प्रशासनाने सचिन औद्योगिक क्षेत्रात केवळ ७३ औद्योगिक कंपन्यांना सुरूवात करण्यास परवानगी दिली आहे. परंतु या कंपन्यांमध्ये एकाही कापड गिरणीचा समावेश नाही.

केवळ टेकस्टाईल लूम, केमिकल, फार्मसी, पॅकेजिंग आणि अभियांत्रिकी कंपन्या चालवण्याची परवानगी आहे. पण ते चालवण्यासाठी मजुरांचीही कमतरता आहे आणि पोलिसांच्या काटेकोरपणामुळे जे येथे मजुरीवर येतात त्यांना येता येत नाही. सचिन अधिसूचित क्षेत्र प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र रामोलिया म्हणतात की येथे अडीच लाख मजूर काम करतात. येथे झालेल्या नुकसानीचा अंदाज बांधणे कठीण आहे. दोन-तीन वर्षांत उद्योग सुरू होऊ शकतात ते पण जेव्हा सरकार मदत पॅकेज देईल.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: चिंपांजीमधील एडिनोविषाणू कोरोनाला हरवणार


या भागात दिनेश भाई धनकानी लिबर्टी ग्रुपच्या नावाने एक कारखाना चालवतात. ते म्हणतात, फक्त १५ ते २० टक्के मशीन चालू आहे. पोलिसांच्या कडक धोरणांमुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कंपन्यांमध्ये काम करायला येणार्‍या लोकांचं सॅनिटायझिंग केलं जातं. शरीराचे तापमान तपासलं जातं. कारखान्यात उत्पादन चालू आहे, परंतु ते लॉकडाऊननंतरच विकलं जाऊ शकतं.

- Advertisement -

या भागाप्रमाणे शहराच्या पांडेसरा औद्योगिक क्षेत्रात सुमारे ११० वस्त्र गिरण्या कार्यरत आहेत आणि रासायनिक कंपन्या स्वतंत्रपणे येथे कार्यरत आहेत. पांडेसरा औद्योगिक क्षेत्रात एकही कापड गिरणी चालवण्यास सरकारने परवानगी दिलेली नाही. येथे दोन रासायनिक कंपनी आणि एक मास्क तयार करणारी कंपनी चालू आहे. सुरतमध्ये सुमारे ३५० कापड गिरण्या कार्यरत आहेत. या कंपन्यांना आतापर्यंत ५०० ते ६०० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे आणि महिन्याला एक कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -