घरताज्या घडामोडीचीनमध्ये लॉकडाऊनला विरोध; पण एकाच दिवसात ४० हजार नवे कोरोनारुग्ण

चीनमध्ये लॉकडाऊनला विरोध; पण एकाच दिवसात ४० हजार नवे कोरोनारुग्ण

Subscribe

चीनमध्ये एकाच दिवसांच ४० हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊनला चीनच्या जनतेले विरोध केला.

चीनमध्ये एकाच दिवसांच ४० हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊनला चीनच्या जनतेले विरोध केला. लॉकडाऊनला विरोध करण्यासाठी जवळपास लाखो चीनच्या नागरिकांनी आंदोलन केले. (Lockdown in china 40 thousand new corona patients in one day)

रविवारी सुमारे ४० हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली. चिनी सोशल मीडिया आणि ट्विटरवर सरकारच्या सार्वजनिक निषेधाचे अनेक व्हिडीओ प्रसिद्ध झाले आहेत. शांघायमध्येही जोरदार निदर्शने झाली. नागरिकांनी सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीपीसी) आणि अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. अनेक आंदोलकांना अटक केल्याची माहिती आहे.

- Advertisement -

विविध विद्यापीठांच्या कॅम्पसमधील निषेधाचे व्हिडीओदेखील प्रसिद्ध झाले आहेत. शेकडो रहिवासी सरकारी कार्यालयांबाहेर लोकांची सेवा करा आणि लॉकडाऊन संपवा अशा घोषणा देत, राष्ट्रगीत गाताना दिसले. हे फुटेजनंतर सेन्सॉर केले गेले. इतर क्लिपमध्ये रहिवासी आणि रस्त्यावर हॅझमॅट सूट घातलेल्या लोकांमध्ये भांडणे दिसली.

बीजिंगमध्ये अनेक ठिकाणी लॉकडाऊनविरोधी निदर्शने झाल्यामुळे अधिकाऱ्यांनी निर्बंध मागे घेतले. दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार ३९ हजार ५०१ कोरोना रुग्णांपैकी ३५ हजार ८५८ मध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत.

- Advertisement -

शिनजियांगची प्रांतीय राजधानी उरुमकी येथे लॉकडाऊन लागू करण्यापासून सरकारने माघार घेतली, जेथे कोविड लॉकडाऊन अंतर्गत असलेल्या अपार्टमेंट ब्लॉकमध्ये गुरुवारी लागलेल्या आगीत १० जण ठार झाले आणि ९ जण जखमी झाले होते. उरुमकीत शनिवारी चिनी नागरिकांनी उईगुर मुस्लिमांसह निदर्शने केली.


हेही वाचा – Gujarat Election: केजरीवालांना मोठा धक्का, ‘आप’च्याच उमेदवाराने दिले भाजपाला समर्थन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -