घरCORONA UPDATECoronaVirus: देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन; पंतप्रधानांची मोठी घोषणा

CoronaVirus: देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन; पंतप्रधानांची मोठी घोषणा

Subscribe

देशात आणखी १९ दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज याची घोषणा केली.

अखेर देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी केलेल्या भाषणात याची घोषणा केली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च रोजी पंतप्रधान मोदींनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्याचा कालावधी आज, १४ एप्रिल रोजी संपला असून आता पुन्हा १९ दिवसांचा लॉकडाऊन वाढवला आहे. दरम्यान, ज्या राज्यांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी आहे. तसेच त्यांनी जर आपल्या राज्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणली तर अशा राज्यांचे २० एप्रिलपर्यंत मुल्यांकन करून तेथील नियम शिथील केले जाऊ शकतील, असेही मोदी यावेळी म्हणाले. त्यासंबंधी सरकार उद्या नवीन नियमावली जारी करणार असल्याचे मोदींनी सांगितले.

- Advertisement -

काय म्हणाले पंतप्रधान 

जगभरात आज कोरोना महामारीने हाहाकार माजवला असून आपण इतर देशांची अवस्था बघत आहोत. मात्र इतर देशांच्या तुलनेत भारताने कमी वेळेत संसर्ग रोखण्याचा प्रयत्न सुरू केला. देशात एकही रुग्ण नसताना आपण परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग सुरु केली होती. जेव्हा रुग्ण आढळले तेव्हा सार्वजनिक गर्दीची ठिकाणे बंद केली. कोरोना रुग्णांचा आकडा ५०० इतकाही झाला नव्हता तेव्हा देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. हे संकट इतकं मोठ आहे की याची तुलना इतर देशांशी करता येणार नाही. मात्र विकसित देशांच्या तुलनेत आपल्या देशाची स्थिती चांगली आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात गोष्टींकरता नागरिकांची साथ मागितली आहे. काय आहेत ही सात सूत्र, वाचा 

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशवासियांना ‘या’ सात सूचना


 


Lockdown: २१ दिवसांत ८ लाख कोटींचं नुकसान


सध्या देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील करोनाबाधितांची संख्या १० हजार ३६३ इतकी झाली आहे. तर यामध्ये ७६ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. यातील ८ हजार ९८८ रुग्णांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. तसेच ३३९ जणांनी या आजारामुळे जीव गमावला आहे. तर १ हजार ०३६ जणांवर उपचार यशस्वी झाले आहेत.

हेही वाचा – PM Narendra Modi Live: ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -