घरCORONA UPDATELockdown - शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार, यामुळे आला प्रकार उघडकीस!

Lockdown – शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार, यामुळे आला प्रकार उघडकीस!

Subscribe

कोचिंग क्लासच्या शिक्षकाने सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी घरी बोलावलं आणि केला बलात्कार

सध्या देशात लॉकडाऊनमुळे आत्यावश्यक सेवा वगळता सगळं काही बंद आहे. त्यामुळे अर्थातच शाळा, कॉलेज आणि क्लासेसही बंद करण्यात आले आहेत. पण एका खासगी क्लासमध्ये अभ्यासाला बोलवून सहावीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाने बलात्कार केला आहे. बिहारच्या मुज्जफरनगरमध्ये हा प्रकार घडला.

बिहारमध्येही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद आहे. पण एका कोचिंग क्लासच्या शिक्षकाने सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी घरी बोलावलं. ही विद्यार्थींनीने आपल्या भावा बहिणींबरोबर कोचिंग क्लासला गेली. यावेळी शिक्षकाने तीच्या तीन भावा बहिणींना एका वेगळ्या खोलीत बसवले आणि त्या विद्यार्थीनीला वेगळ्या खोलीत घेऊन गेला आणि तीच्यावर बलात्कार केला.यावेळी आरोपीचा भाऊ तीथे पोहचला. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

- Advertisement -

यावेळी पीडीतेने भावाला सगळा घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर संपूर्ण दिवस गावातील पंचायतीसमोर यावर चर्चा झाली. त्यानंतर पीडितेच्या आईने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. त्यानंतर पीडितेची आरोग्य तपासणी करण्यात आली. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. बेनीबाद पोलिस सध्या आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -