घरदेश-विदेशLockDown: रूग्ण म्हणून अॅम्ब्युलन्सने गेला अन् लग्नासाठी मुलगी घेऊन आला!

LockDown: रूग्ण म्हणून अॅम्ब्युलन्सने गेला अन् लग्नासाठी मुलगी घेऊन आला!

Subscribe

जिल्हा प्रशासनाने अहमद आणि त्याच्या पत्नीला केले क्वारंटाईन

देशात असलेल्या लॉकडाऊनमध्ये असे अनेक प्रकार समोर येत आहेत, ज्यात काही लोकं पोलिसांनाच फसवून आपली कामं करत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमधून समोर आली आहे. येथील खतौली विधानसभेत एका युवकाने स्वत: च्या निकाहसाठी वेगळीच शक्कल लढवली. तो युवक स्वतः रुग्ण बनून अॅम्ब्युलन्समध्ये बसला आणि गाझियाबादमधील शहीदनगर येथून वधू मुलीला घेऊन आला.

असा घडला प्रकार

काही दिवसांपूर्वी खतौली शहरातील इस्लामनगर परिसरात राहणारा अहमद हा तरुण वडील इसरार यांच्यासोबत ओळखीच्या असणाऱ्या अॅम्ब्युलन्स ड्रायव्हर मेहबूब याच्यासोबत गाझियाबादच्या शहीद नगर भागात लग्न (निकाह) करण्यासाठी दाखल झाला. निकाहनंतर त्याने आपल्या वधूलाही घरी आणले. ज्याठिकाणी तो राहत होतो त्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण अधिक असल्याने आधीच तो भाग प्रशासनाकडून सील करण्यात आला होता, असे पोलीस निरीक्षक संतोषकुमार त्यागी यांनी सांगितले.

- Advertisement -

लग्न पडलं चांगलंच महागात

लग्नाचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून अहमद आणि त्याच्या पत्नीला क्वारंटाईन करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अॅम्ब्युलन्स चालक मेहबूब, अहमद आणि त्याचे वडील हाजी इसरार यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.


ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन बनले बाबा, होणाऱ्या पत्नीने दिला बाळाला जन्म

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -