Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Delhi Unlock Phase 2: मॉल्स, मार्केटमधील दुकाने सम-विषम सुरू, ५० टक्के क्षमतेसह...

Delhi Unlock Phase 2: मॉल्स, मार्केटमधील दुकाने सम-विषम सुरू, ५० टक्के क्षमतेसह धावणार मेट्रो

Related Story

- Advertisement -

देशभरात कोरोनाचा कहर सध्या नियंत्रणात येत असल्याने कित्येक राज्यात लॉकडाऊनचे कडक निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १४ जून पहाटे ५ वाजेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली आहे. परंतु यावेळी त्यांनी लॉकडाऊनच्या निर्बंधातही अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. गेल्या आठवड्यात कारखाने व बांधकाम उपक्रम सुरू करण्यात आले होते आणि तरीही परिस्थिती नियंत्रणात असल्याचीही त्यांनी माहिती दिली. दिल्लीमध्ये हळूहळू कोरोनाची परिस्थिती चांगली होत आहे, त्या दृष्टीने दिल्लीत अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले. ७ जून रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत लॉकडाऊन राहील. यानंतर अनेक कामांमध्ये सूट दिली जाणार आहे. दिल्लीत मॉल्स, मार्केट सम-विषम तारखेनुसार सुरू होणार असून दिल्ली मेट्रो  देखील ५० टक्के क्षमतेने धावणार आहे. यासह सोमवारपासून कार्यालये सुरू केली जाणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनीही जाहीर केले.

- Advertisement -

या लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात सरकारी कार्यालयांमध्ये वर्ग १ व त्यावरील श्रेणीतील अधिकारी १०० टक्के क्षमतेसह उपस्थिती राहतील. त्याखालील कर्मचारी ५० टक्के उपस्थितीत हजर राहतील, तर खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचार्‍यांना येण्याची परवानगी देण्यात येईल. अरविंद केजरीवाल यांनी सर्व खासगी कार्यालयांना आपल्या कर्मचार्‍यांना घरून काम करण्यास सांगण्याचे आवाहन केले आहे.

अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

  • दुकाने विषम-सम-तारखेनुसार उघडतील
  • वर्ग एक अधिकारी कामावर १०० टक्के हजर राहतील
  • ५० टक्के कर्मचार्‍यांसह खासगी कार्यालये उघडता येणार
  • दिल्ली मेट्रो ५० टक्के प्रवाशांसह धावणार
  • सकाळी आठ ते रात्री दहा या वेळेत बाजारपेठा उघडतील.
- Advertisement -

कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता शुक्रवारी तज्ज्ञ आणि तत्कालीन अधिकाऱ्यांसह बैठक झाली. त्यामध्ये तयारीबाबत चर्चा करण्यात आल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. या बैठकीत हे समोर आले की तिसरी लाट आली तर ३७ हजार बेडची आवश्यकता भासेल. त्यानुसार, बेड तयार केले जातील, ऑक्सिजनची उपलब्धता केली जाईल. दिल्लीसाठी ४२० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध असेल. पुरवठ्यासाठी २५ टँकरची खरेदी केली जाणार आहे. ऑक्सिजनच्या ६४ प्लांट उभारली जात आहेत. औषधांसाठी पुरेशी व्यवस्था देखील करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -