घरCORONA UPDATEसरकार कोरोनाविषयी सर्वेक्षण करणार फोनवरून, १९२१ नंबरवरून येणार कॉल!

सरकार कोरोनाविषयी सर्वेक्षण करणार फोनवरून, १९२१ नंबरवरून येणार कॉल!

Subscribe

लोकांनी हा सर्वे गांभीर्याने घेणं गरजेच आहे. जेव्हा नागरिकांना १२१ या नंबरवरून कॉल येईल. त्यावेळी विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तर अचूक पध्दतीने देणं गरजेचं आहे.

कोरोना व्हायरसचा आढावा घेण्यासाठी सराकारने मंगळवारी एक घोषणा केली. कोरोना व्हायरसवरील नागरिकांचा अभिप्राय सरकार गोळा करणार आहे. फोन कॉलद्वारे हे सर्वेक्षण केलं जाणार आहे. नागरिकांना त्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर १२१ या नंबरवरून फोन येणार आहेत. सरकारने नागरिकांना सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. पण केवळ १२१ या नंबरवरूनच हा फोन येणार आहे. अन्य नंबरवरून येणाऱ्या फोनवरून तुमची फसवणूक होऊ शकते, त्यामुळे सावधगिरी बाळगा असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. हे सर्वेक्षण भारत सरकारच्या राष्ट्रीय माहिती केंद्र (एनआयसी) तर्फे करण्यात येणार आहे.

- Advertisement -

लोकांनी हा सर्वे गांभीर्याने घेणं गरजेच आहे. जेव्हा नागरिकांना १९२१ या नंबरवरून कॉल येईल. त्यावेळी विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तर अचूक पध्दतीने देणं गरजेचं आहे. कोरोना विषयी जर लक्षण दिसत असल्यास त्या विषयी माहिती देणं गरजेचं आहे. असं पीआयबीने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. शिवाय दुसऱ्या नंबरवरून फसवे कॉल येऊ शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचा इशाराही दिला आहे.

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या १८ हजारांच्या वर गेली आहे. आरोग्य विभागाने मंगळवारी सकाळी १८,६०१ रूग्ण सध्या देशात आहे याची माहिती दिली. यातील १४ ७५९ रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ३२५२ लोकं कोरोना मुक्त झाली आहेत. तर ५९० लोकांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

सुरूवातीला भारतात २२ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र आता ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.


हे ही वाचा – Lockdown- गरजूंच्या मदतीला ‘ती’चा हात, चालवते मोफत ऑटोरिक्षा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -