घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : भाजपची 11 उमेदवारांची आठवी यादी जाहीर; सनी देओलचे...

Lok Sabha 2024 : भाजपची 11 उमेदवारांची आठवी यादी जाहीर; सनी देओलचे तिकीट रद्द

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने 11 उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली आहे. या यादीत ओडिशामध्ये 3, पंजाबमध्ये 6 आणि पश्चिम बंगालमध्ये 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपने पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून सनी देओलचे तिकीट रद्द केले आहे. या जागेवरून दिनेश सिंह उर्फ बब्बू यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पंजाब : लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने 11 उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली आहे. या यादीत ओडिशामध्ये 3, पंजाबमध्ये 6 आणि पश्चिम बंगालमध्ये 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपने पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून सनी देओलचे तिकीट रद्द केले आहे. या जागेवरून दिनेश सिंह उर्फ बब्बू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आपच्या माजी खासदार रिंकू यांना जालंधरमधून तिकीट मिळाले आहे. पंजाबमधील सर्व 13 जागांवर भाजप पहिल्यांदाच एकटे लढत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापर्यंत 8 यादीत 418 नावे जाहीर केली आहेत. (Lok Sabha 2024 BJP eighth list of 11 candidates announced Sunny Deol ticket cancelled)

भाजपने आठव्या यादीपूर्वी जाहिर केलेल्या सातव्या यादीत महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश होता. त्यानुसार, भाजपने 28 मार्च रोजी उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली होती. या यादीत दोन राज्यातील दोन उमेदवारांची नावे होती. नवनीत राणा यांना अमरावती येथून तिकीट देण्यात आले आहे. दुसरे नाव गोविंद करजोल यांचे असून ते कर्नाटकातील चित्रदुर्गातून निवडणूक लढवणार आहेत.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी सहावी यादी जाहीर केली. ज्यामध्ये 3 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. इंदुदेवी जाटव यांना राजस्थानमधील करौली-धोलपूर आणि कन्हैयालाल मीना यांना दौसामधून उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन्ही जागांसाठी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात लोकसभेच्या पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली-चिमूर या मतदारसंघाचा समावेश आहे. या पाच मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदारप्रक्रिया पार पडणार आहे. तसेच, 4 जून मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांसाठी एकूण 97 उमेदवार रिंगणात आहेत.

- Advertisement -

रामटेक, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून एकूण 13 उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. पण नागपूर, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून एका उमेदवारे आपला अर्ज मागे घेतला नाही.


हेही वाचा – Lok Sabha 2024 : नाशिकचा वाद सोडवण्यासाठी शिंदेंचा अजित पवारांना शिरूरचा प्रस्ताव; वाचा सविस्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -