घर देश-विदेश लोकसभा 2024 : भाजप भाकरी फिरवणार; विद्यमान खासदारांची तिकिटं कापणार!

लोकसभा 2024 : भाजप भाकरी फिरवणार; विद्यमान खासदारांची तिकिटं कापणार!

Subscribe

पंक्षांतर्गत केलेल्या सर्व्हेनुसार, भारतीय जनता पक्षाचे काही खासदारांचे काम चांगल नाही आहे. त्यांच्यावर नागरिक नाराज आहेत. यामुळे त्यांच्या तिकिट कापलं जाऊ शकतं, असं म्हटलं जात आहे.

लोकसभेच्या 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाने दिल्लीतील सर्व म्हणजे सातही लोकसभा जागांसाठीच्या प्रभारींची नावं देखील काही दिवसांपूर्वी जाहीर केली होती. आगामी लोकसभेत भाजप नेतृत्व दिल्लीतील सध्याचे किमान तीन ते चार खासदार बदलतील अशीही चर्चा आहेत. त्यातच आता विद्यमान खासदारांची तिकीटं कापली जाणार असल्याच्याही चर्चा आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा 2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजप आता मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. (Lok Sabha 2024 BJP will rotate bread The tickets of existing MPs will be cut)

पक्षांतर्गत सर्व्हेनुसार निर्णय?

लोकसभा 2024 ची निवडणूक ही भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. 2014 मध्ये भाजप सत्तेत आलं. त्यानंतर 2019 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदींची लाट होती. 2014 पेक्षा 2019 मध्ये अधिक जागांवर भाजप निवडून आलं. त्यानंतर आता मात्र 2024ची निवडणूक भाजपसाठी अतिमहत्त्वाची बनली आहे. या निवडणुकीत मोदींची जादू चालते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणारे. त्यामुळेच भाजपने आता पक्षांतर्गत सर्व्हेतून काही खासदारांची नावं काढली आहेत. ज्यांची तिकिटं येत्या काळात कापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

पंक्षांतर्गत केलेल्या सर्व्हेनुसार, भारतीय जनता पक्षाचे काही खासदारांचे काम चांगल नाही आहे. त्यांच्यावर नागरिक नाराज आहेत. यामुळे त्यांच्या तिकिट कापलं जाऊ शकतं, असं म्हटलं जात आहे.

भाजपचे काही खासदार नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडून आले होते. सध्याच्या तिसऱ्या टर्मध्ये्ही मोदींचं नाव आपल्या कामी येईल असं त्यांना वाटत आहे. मात्र, त्यांनी आपल्याला बजावलेलं कामही पूर्णपणे केलेलं नाही.

- Advertisement -

तसंच, खासदारांना मिळणारा निधीदेखील वापरला गेलेला नाही. लोकांशी संपर्क कमी झाला आहे. तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांनीच विद्यमान खासदारांना तिकिट देण्यास विरोध केला आहे. अशावेळी या खासदारांचं तिकिट कापलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे, अशा बातम्या सध्या समोर येत आहेत.

(हेही वाचा: “जालन्यातील लाठीचार्जमध्ये फडणवीसांचा हात नाही, तर…”, रामदास आठवलेंचे मोठे विधान )

इंडिया आघाडीचं बैठकांचं सत्र 

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये  भाजपचा पराभव करण्यासाठी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. तीन बैठका घेण्यात आल्या आहेत. काही दिवसांतच दिल्लीत या आघाडीच्या लोगोचंही अनावरण केलं जाणार आहे. तसंच, पुढच्या काळात होणाऱ्या बैठकीत मोदी सरकारविरोधात लढण्याची रणनितीदेखील आखली जाणार आहे.

- Advertisment -