Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशLok Sabha 2024: रणदीप सुरजेवाला यांची हेमा मालिनींवर आक्षेपार्ह टिप्पणी, कंगना राणौत...

Lok Sabha 2024: रणदीप सुरजेवाला यांची हेमा मालिनींवर आक्षेपार्ह टिप्पणी, कंगना राणौत भडकली

Subscribe

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी भाजप उमेदवार हेमा मालिनी यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली आहे.

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्यावर भाजप उमेदवार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी भाजप उमेदवार हेमा मालिनी यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करताना हा आरोप केला आहे. कंगना राणौतनेही या व्हिडिओवरून काँग्रेसवर हल्लाबोल केला. मात्र हा व्हिडीओ कधीचा आहे हे स्पष्ट झालेले नाही. (Lok Sabha 2024 Randeep Surjewala s Offensive Comment on Hema Malini Kangana Ranaut Furious)

भाजपने बुधवारी काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांच्यावर उत्तर प्रदेशातील मथुरा येथील भाजप खासदार हेमा मालिनी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप केला आहे. यावरून प्रमुख विरोधी पक्ष महिलांचा द्वेष करत असल्याचे दिसून येते, असा आरोप भाजपने केला.

- Advertisement -

भाजपचे आयटी विभाग प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये काँग्रेस खासदार सत्ताधारी पक्षावर हल्ला करताना अभिनेत्री-नेत्याबद्दल काही आक्षेपार्ह टिप्पणी करत आहेत. मात्र हा व्हिडिओ कधीचा आहे हे कळू शकलेले नाही. ते म्हणाले, “काँग्रेस खासदार रणदीप सुरजेवाला यांनी हेमा मालिनी यांच्यावर अशोभनीय टिप्पणी केली आहे, जी केवळ त्यांचाच नाही तर सर्व महिलांचा अपमान आहे.”

व्हिडिओमध्ये रणदीप सुरजेवाला म्हणत आहेत की आमदार/खासदार का बनवले जातात? जेणेकरून ते जनतेचा आवाज उठवू शकतील. परंतु हेमामालिनी सारख्या***** असं म्हणत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.

- Advertisement -

कंगना राणौत भडकली

रणदीप सुरजेवालाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताना कंगना रणौत लिहिते की, तुमचे नेते तर मोहब्बत की दुकान उघडणार म्हणत होते. आता तुम्ही द्वेष आणि तिरस्काराचं दुकान उघडलं आहे. महिलांबाबत काँग्रेस किती खालच्या पातळीचा विचार करतं हेच तुम्ही दाखवून देत आहात. निराशेमुळे त्यांचे चारित्र्य दिवसेंदिवस खराब होत आहे.

हेमा मालिनी या लोकसभा निवडणुकीत मथुरेतून भाजपच्या उमेदवार आहेत हे विशेष. आज त्या मथुरा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

(हेही वाचा: Lok Sabha 2024: आनंदराज आंबेडकरांकडून उमेदवारी मागे; वंचितला पाठिंबा देणार)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -