घरदेश-विदेशराहुल गांधींच्या पंतप्रधानपदाचा मार्ग खडतर

राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाचा मार्ग खडतर

Subscribe

उत्तरप्रदेशमध्ये सपा आणि बसपाची लोकसभेसाठीची बोलणी ही अंतिम टप्प्यात आली आहे. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती आता अखिलेश यादव यांची भेट घेऊन जागा वाटपाच्या निर्णयाला अंतिम स्वरूप देणार आहेत.

उत्तरप्रदेशमध्ये सपा आणि बसपाची लोकसभेसाठीची बोलणी ही अंतिम टप्प्यात आली आहे. बसपाच्या सर्वेसर्वा मायावती आता अखिलेश यादव यांची भेट घेऊन जागा वाटपाच्या निर्णयाला अंतिम स्वरूप देणार आहेत. डिसेंबरच्या शेवटी किंवा नवीन वर्षाच्या सुरूवातीला यावर निर्णय होणार असल्याची माहिती एका नेत्यानं नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. हिंदुस्तान टाईम्सनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. सपा आणि बसपामध्ये लोकसभेसाठी एकी झाल्यानं आता राहुल गांधी यांच्या पंतप्रधानपदाचा मार्ग हा आणखी खडतर झाला आहे. शिवाय, भाजपविरोधी महाआघाडीला देखील हा धक्का मानला जात आहे. दरम्यान, सपा सोबतच राष्ट्रीय लोक दल, जेसीसीनं देखील मायावती यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या समोर आता मायावती यांचं देखील आव्हान असणार आहे. सपा आणि बसपाची लोकसभेसाठी युती झाल्यानं आता प्रचाराला देखील वेग येईल.

वाचा – राहुल गांधींच्या ‘बस’ डिप्लोमसी, भाजप अडचणीत?

सपा आणि बसपानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार, जनता दल सेक्युलरचे प्रमुख एच. डी. देवेगौडा, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी, तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे. त्यामुळे आता पंतप्रधानपदासाठी मायावती यांनी देखील मोर्चे बांधणी करायला सुरूवात केली आहे असं स्पष्ट होत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याशी देखील चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे भाजपविरोधात एका नवीन आघाडीचा जन्म होऊ शकतो. सध्या काँग्रेस देखील राहुल गांधी यांना पंतप्रधानपदासाठी पुढे आणताना दिसत आहे. त्याचवेळी मायावती देखील राजकीय पटावर वेगानं हालचाली करत आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी आता मायावती यांच्या नावाची चर्चा देखील होताना दिसत आहे.

वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींना झोपू देणार नाही – राहुल गांधी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -