घरदेश-विदेशLok Sabha 2024 : भाजपात गेले नाही तर महिनाभरात माझ्यासह चौघे तुरुंगात;...

Lok Sabha 2024 : भाजपात गेले नाही तर महिनाभरात माझ्यासह चौघे तुरुंगात; काय आहे अतिशी यांचा दावा?

Subscribe

Lok Sabha Election 2024 : दिल्लीतील कथित मद्य परवाना घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे स्वतः न्यायालयीन कोठडीत आहेत. याप्रकरणी आणखी काही आप नेत्यांना तुरुंगात जावे लागेल, अशी शक्यता आहे. यात प्रामुख्याने आतिशी मार्लेना, सौरभ भारद्वाज यांचा समावेश आहे. याची माहिती स्वतः आतिशी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे.

नवी दिल्ली : सध्या नवी दिल्लीतील आप सरकारमधील अनेक मंत्री तुरुंगात आहेत. दिल्लीतील कथित मद्य परवाना घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे स्वतः न्यायालयीन कोठडीत आहेत. तसेच याप्रकरणी आणखी काही आप नेत्यांना तुरुंगात जावे लागेल, अशी शक्यता आहे. यात प्रामुख्याने आतिशी मार्लेना, सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि राघव चड्ढा यांचा समावेश आहे. याची माहिती स्वतः आतिशी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. (Lok Sabha Election 2024 Aap Atishi sensational claim about BJP)

हेही वाचा… Lok Sabha Election : आमचा दरवाजा ठोठावलात तर…; हेमंत गोडसेंच्या नाराजीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

- Advertisement -

दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी या अडचणीत आल्या आहेत. आरोपी विजय नायर हा आतिशी आणि भारद्वाज यांच्या थेट संपर्कात होता, असा जबाब मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्याचा दावा ईडीने कोर्टात केला आहे. यावरून आतिशी यांनी आपच्या आणखी चार नेत्यांना अटक होणार असून मी भाजपात नाही गेले तर महिनाभरात मी पण जेलमध्ये असेन असा दावा केला आहे.

भाजपात न गेल्यास अटक

मी भाजपात नाही गेले तर ईडी मला अटक करणार आहे, असा संदेश भाजपाने माझ्या एका निकटवर्तीयाकडून दिला आहे. ईडी काही दिवसांतच माझ्या घरी छापा मारणार आहे. पुढील दोन महिन्यांत आपच्या चार नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कट आहे. यामध्ये माझ्यासह सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि राघव चड्ढा यांचा समावेश आहे, असा दावा आतिशी यांनी केला आहे.

- Advertisement -

आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरत नाही

मी भाजपाला सांगू इच्छिते की, आम्ही तुमच्या धमक्यांनी घाबरणारे नाहीत. आम्ही भगतसिंहांचे चेले आहोत, केजरीवालांचे शिपाई आहोत. जोपर्यंत आपच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये शेवटचा श्वास असेल तोवर आम्ही देश वाचवत राहू, असे त्या म्हणाल्या. ईडीने मुद्दाम माझे आणि भारद्वाज यांचे नाव कोर्टात घेतले असावे. हा जबाब ईडी आणि सीबीआयकडे दीड वर्षांपासून उपलब्ध होता. हे वक्तव्य सीबीआयच्या चार्जशीटमध्ये आणि ईडीकडेही आहे. मग आताच या जबाबावर बोलण्याचा हेतू काय, असा सवालही आतिशी यांनी केला आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेपासून आम आदमी पार्टी भाजपा आणि केंद्र सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहे. दिल्लीच्या कॅबिनेट मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाने पक्षात घेण्यासाठी त्यांना संपर्क साधल्याचे दावा केला. त्यानंतर सौरभ भारद्वाज यांनीही मीडियासमोर येत अटक होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. रामलीला मैदानावरील रॅलीमुळे भाजपा अस्वस्थ झाली आहे आणि आमच्या आणखी नेत्यांना अटक करण्याची तयारी करत आहे. त्यामुळे पुढचा नंबर माझा आणि मग आतिशी यांचा आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा… Excise Policy of Delhi : आप नेते संजय सिंह यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन; 6 महिन्यांनंतर तुरुंगात बाहेर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -