घरदेश-विदेशLok Sabha Election 2024 : दिल्लीत काँग्रेस आणि आपमधील जागावाटपाचा तिढा सुटला

Lok Sabha Election 2024 : दिल्लीत काँग्रेस आणि आपमधील जागावाटपाचा तिढा सुटला

Subscribe

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियामध्ये जागावाटपावरून कुरबुर सुरू असल्याचे चित्र आहे. मात्र, उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीबरोबरचा बेबनाव दूर झाल्यानंतर काँग्रेसने आता दिल्लीतही आम आदमी पार्टीबरोबर जागावाटपाबाबत यशस्वी चर्चा केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे दिल्लीत आप आणि काँग्रेस एकत्रित निवडणूक लढविणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

हेही वाचा – Election Commission : निवडणूक आयोगाने घेतली पोलीस अधिकाऱ्यांची बैठक, काय आहे कारण?

- Advertisement -

लोकसभा निवडणुकांसाठी एकीकडे भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत विविध बडे नेते, पक्ष सामील होत आहेत. पण दुसरीकडे इंडियामधील विविध पक्ष आपली वेगळी चूल मांडत आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्व आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या राज्यात लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी इंडियाला रामराम केला आणि कोणत्याही पक्षासोबत युती न करता जम्मू-काश्मीरमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पार्टीतील जागावाटपाचा तिढा निर्माण झाला होता. यावरून समाजवादी पार्टी देखील स्वबळावर निवडणुकांना समोरे जाईल, असे वाटत होते. मात्र, उत्तर प्रदेशातील 80 जागांकरिता 63-17 या फॉर्म्युलावर सपा आणि काँग्रेस यांची सहमती झाली. तर, आता दिल्लीमध्ये एकूण सात जागांपैकी आम आदमी पार्टी चार तर काँग्रेस तीन जागांवर निवडणूक लढवू शकते. दिल्लीत आम आदमी पक्षाने लोकसभा निवडणुकीत आघाडी करण्यासाठी काँग्रेसला तीन जागा देऊ केल्या आहेत. तसेच आघाडीतील समझोत्यानुसार काँग्रेस गुजरातमधील भरूचची जागा आम आदमी पक्षाला देऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – Sharad Pawar : राजकीय मैदान 57 वर्षांपासून गाजवणारा तेल लावलेला पैलवान म्हणजेच…

काही प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आम आदमी पार्टीने चांदनी चौक तसेच पूर्व दिल्ली आणि ईशान्यची जागा देण्याचा प्रस्ताव काँग्रेसला दिला आहे. आपच्या तीन जागांच्या ऑफरला काँग्रेसने सहमती दर्शवली आहे. याआधी आपने काँग्रेसला एक जागा देऊ केली होती. त्याचबरोबर नवी दिल्ली, दक्षिण दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि उत्तर पश्चिम दिल्लीच्या जागांवर आम आदमी पार्टी निवडणूक लढवू शकते. यावर जवळपास एकमत आहे. त्याची औपचारिक घोषणा आज, गुरुवारी होऊ शकते.

हेही वाचा – Mahananda Dairy : ‘महानंद’चे अध्यक्ष राजेश परजणे यांचा राजीनामा; एनडीडीबीकडे हस्तांतरित होणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -