घरदेश-विदेशLok Sabha 2024 : भारतावर लक्ष ठेवायची गरज नाही; का म्हणाली अमेरिका...

Lok Sabha 2024 : भारतावर लक्ष ठेवायची गरज नाही; का म्हणाली अमेरिका असं?

Subscribe

Lok Sabha 2024 : भारतात लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन, शुक्रवार, 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानही झाले. या निवडणुकांसाठी भारतात पर्यवेक्षकाला पाठवण्यात येणार आहे का, असे विचारले असता अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात लक्ष ठेवण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारतात लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन, शुक्रवार, 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानही झाले. या निवडणुकांसाठी भारतात पर्यवेक्षकाला पाठवण्यात येणार आहे का, असे विचारले असता अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात लक्ष ठेवण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. (Lok Sabha Election 2024 united states said not sending any election observers to India for elections)

पाकिस्तानसाठी वेगळा नियम

पाकिस्तानातही नुकत्याच निवडणुका झाल्या. मात्र, तेथील निवडणुकांवर अमेरिकेसह अनेक युरोपीय देशांनी प्रश्न उपस्थित केले होते. तेव्हाच अमेरिकेने याची चौकशी करणार असल्याचे म्हटले होते. आता भारतात देखील सार्वत्रिक निवडणुका सुरू आहेत. मग अमेरिका तिथे देखील लक्ष ठेवणार का, असा प्रश्न उपस्थित केला असता, भारतासारख्या देशात लक्ष ठेवायची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. उलट, भारतासोबत आमचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचे अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ता वेदांत पटेल यांनी आपल्या रोजच्या पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, भारतातील लोकसभा निवडणुका शुक्रवार, 19 एप्रिलपासून सुरू झाल्या आहेत. ही निवडणूक सात टप्प्यात होणार असून 4 जून रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 55.29 टक्के मतदान; इतर राज्यांची परिस्थिती काय?

पाकिस्तानमधील निवडणुकांनंतर अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मॅथ्यू मिलर म्हणाले होते की, निवडणुकांमधील गोंधळ किंवा हस्तक्षेपाच्या कोणत्याही आरोपांची पाकिस्तानने आपल्या कायद्यानुसार पूर्णपणे आणि पारदर्शकपणे चौकशी केली पाहिजे. पाकिस्तानमधील निवडणुकांबाबत चिंता व्यक्त करणारे मिलर हे एकमेव अमेरिकन अधिकारी नाहीत तर डेमोक्रेटिक पार्टीच्या ग्रेगोरियो कैसर यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 35 काँग्रेस सदस्यांनी राष्ट्रपती जो बायडेन आणि राज्य सचिव अँटनी ब्लिंकन यांना पत्र लिहीत इस्लामाबादमध्ये नव्याने स्थापन झालेल्या सरकारला मान्यता न देण्याची विनंती केली होती. (Lok Sabha Election 2024 united states said not sending any election observers to India for elections)

- Advertisement -

Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -