घरदेश-विदेशअमित शहा इन अडवाणी आऊट

अमित शहा इन अडवाणी आऊट

Subscribe

लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीची आचारसंहिताही लागू झाली आहे. काँग्रेससह देशातील प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केल्या आहेत. मात्र भाजपची यादी अद्याप जाहीर झाली नव्हती. ही यादी कधी जाहीर होणार याची प्रतिक्षा भाजपच्या कार्यकर्त्यांसह त्यांच्या विरोधकांनाही होती. अखेर भाजपने गुरुवारी आपली पहिली यादी जाहीर केली.

भाजप नेते जे. पी. नाडा यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ही यादी १८२ उमेदवारांची आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाध्यक्ष अमित शहांचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते राजनाथ सिंह हे लखनौमधून, केंद्रीय मंत्री डॉ. सत्यपाल सिंह बागपतमधून, विद्यमान खासदार हेमामालिनी मथुरातून निवडणूक लढवणार आहेत.

- Advertisement -

अमेठीतून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपने पुन्हा स्मृती इराणी यांना उभे केले आहे. तर माजी लष्करप्रमुख आणि विद्यमान मंत्री जनरल व्ही. के. सिंह हे गाझीयाबाद, उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवणार आहेत. आपल्या वादग्रस्त विधानांसाठी नेहमी चर्चेत असलेले विद्यमान खासदार साक्षी महाराज यांना पुन्हा उन्नाव येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांना पूर्व, अरुणाचल प्रदेशातून उमेदवार देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हे जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथून निवडणूक लढतील. तर केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे हे कर्नाटकतील उत्तर कन्नडा येथून निवडणूक रिंगणात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -