काँग्रेस नेते, खासदार प्रियांका गांधी यांनी लोकसभेत संविधानाच्या मुद्द्यावर चर्चा करताना भाजपवर हल्लाबोल केला. निवडणुका जर बॅलेट पेपर घेतल्या, तर सत्य समोर येईल आणि देशातील जनतेला भाजपच्या खऱ्या चेहऱ्याबद्दल कळेल, असं प्रियांका गांधी यांनी म्हटलं.
पोटनिवडणुकीत वायनायमधून निवडून आल्यानंतर प्रियांका गांधी यांनी पहिल्यांदाचा लोकसभेत भाषण केलं. प्रियांका गांधी म्हणाल्या, “भाजप संविधानच्या चिंधड्या उडवत आहे. भाजपला फक्त आपली सत्ता वाचवायची माहिती आहे. संविधानच्या प्रती भाजपची भावना द्वेष आणि हिंसेने प्रेरित आहे. मात्र, हे लोकशाहीच्या मूल्यांविरोधात आहे.”
हेही वाचा : पहिलंच भाषण अन् सत्ताधारी पाहतच राहिले, प्रियंका गांधींनी भाजपला सोलून काढलं; एका व्यक्तीचं नाव घेताच…
“निवडणुका निष्पक्ष आणि ईमानदारीनं बॅलेट पेपरवर झाल्या, तर भाजपला सत्याचा सामना करावा लागेल,” असा दावा प्रियांका गांधी यांनी केला आहे.
“लोकसभा निवडणुकीत हे निकाल आले नसते, तर संविधान बदलायला सुरूवात केली आहे. खरे तर, हे वारंवार संविधान-संविधान करत आहेत. कारण, यांना देशातील जनता संविधान बदलू देणार नाही, हे माहीत झाले आहे. पराभूत होता-होता हे यांच्या लक्षात आलं आहे,” असा टोला प्रियांका गांधी यांनी भाजपला लगावला आहे.
हेही वाचा : राज्यसभेत राडा! धनखड म्हणाले, “मी शेतकऱ्याचा मुलगा”; खर्गे संतापले अन् सुनावत म्हटलं, “मग मी…”