घरदेश-विदेशLoksabha 2024: भाजपाची पाचवी यादी जाहीर; अभिनेत्री कंगना रणौतला मंडीमधून उमेदवारी

Loksabha 2024: भाजपाची पाचवी यादी जाहीर; अभिनेत्री कंगना रणौतला मंडीमधून उमेदवारी

Subscribe

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक नावं समोर आली आहेत. महाराष्ट्रातील तीन जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अभिनेत्री कंगना रणौतलादेखील मंडीमधून तिकीट देण्यात आलं आहे. वरुण गांधी यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. तर मनेका गांधी यांचं नाव मात्र या यादीत आहे, त्या सुलतानपूरमधून उमेदवार असणार आहेत. (Loksabha 2024 BJP s fifth list announced Actress Kangana Ranaut nominated from Mandi)

भाजपाकडून 111 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर

भाजपाने लोकसभेसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये 111 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपाने कंगना रणौतसह छोट्या पडद्यावर श्रीरामाची भूमिका साकारणारा अभिनेता अरुण गोविल यांनाही लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील तिघांना संधी

भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघातून भाजपाने पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा संधी दिली आहे. तर गडचिरोली लोकसभा मतदारसंघातूनही पुन्हा एकदा विद्यमान खासदार अशोक नेते यांना संधी देण्यात आली आहे. सुनील मेंढे दुसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीत उतरत आहेत. ते गेले पाच वर्षे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. तर अशोक नेते यांची ही लोकसभा निवडणुकीची तिसरी वेळ आहे. अशोक नेते गेले दहा वर्षे गडचिरोलीचे खासदार आहेत.

कंगना रणौतला भाजपाकडून उमेदवारी

हिमाचल प्रदेशातली मंडी लोकसभा मतदारसंघातून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला भाजपाने उमेदवारी दिली आहे. तर उत्तर प्रदेशातली मेरठ मतदारसंघता अभिनेता अरुण गोविल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या 111 भाजपा उमेदवारांमध्ये तीन उमेदवारी महाराष्ट्रातील आहेत. भाजपाची ही महाराष्ट्रातील तिसरी यादी आहे.

- Advertisement -

मंडी- कंगना रणौत
मेरठ- अरुण गोविल

महाराष्ट्रातील भाजपाची तिसरी यादी

  • भंडारा- गोंदिया -सुनील बाबुराव मेंढे
  • गडचिरोली- अशोक महादेव राव नेते
  • सोलापूर (अजा)- राम सातपुते

(हेही वाचा: Chandrapur Loksabha 2024: चंद्रपुरात प्रतिभा धानोरकरांच्या नावावर शिक्कामोर्तब; वडेट्टीवारांचा पत्ता कट)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -