नवी दिल्ली : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने तयारी सुरू केली आहे. सध्या एनडी आणि इंडिया हे दोन्ही गट आपला गट मजबूत करण्यात गुंतले आहे. दरम्यान त्यासाठी त्या-त्या राज्यातील स्थानिक प्रादेशिक पक्षाना आपल्या गळाला लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र, अशातच आता बहुजन समाजवादी पार्टीने आपली भूमिका जाहीर केली असून, ते कोणत्याही गटात जाणार नसून स्वतंत्ररित्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची घोषणा पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी केली आहे. (Loksabha 2024 : Neither NDA nor INDIA; BSP gave the slogan ‘Ekla Chalo’)
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेस-भाजप हे दोन्ही पक्ष आमने सामने असून, भाजपच्या मित्रपक्षांचा एनडीए तर कॉंग्रेसच्या मित्रपक्षांचा इंडिया गट सध्या देशातील राजकारणात ठळकपणे दिसून येत आहेत. मात्र असे जरी असले तरी या दोन्ही गटाकडे न जाता आपला एकला चलोचा नारा देणाऱ्या पक्षांची संख्याही कमी नाही. आतापर्यंत देशातील 8 पक्ष कोणत्याच गटात सहभागी नसून, ते स्वतंत्ररित्या निवडणुकांना सामोरे जाणार आहे. दरम्यान बहुजन समाज पक्षाची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकींबाबत साधक-बाधक चर्चा झाली असून, यावेळी पक्षाने अधिकृतरित्या एक परित्रक जारी केले असून, त्यामध्ये आपण कोणत्याच गटासोबत नसून, स्वतंत्ररित्या निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.
युतीमुळे फादयाएवजी तोटाच
बहुजन समाज पक्षाच्या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांना पक्ष संघटना वाढीच्या सूचना दिल्या आहेत. तर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, आतापर्यंत केलेल्या युतीमुळे पक्षाला फायदा झाला नसून, तोटाच झाला आहे असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा : Chandrayaan 3 बद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का? रांचीत लाँचिंग पॅड तर…
भाजप-कॉंग्रेसच्या वागण्यात काही फरक नाही
कोणत्याच गटात सहभागी न झालेल्या बसपा पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी कॉंग्रेस आणि भाजपवर कडाडून टीका केली. बैठकीत त्यांनी म्हटले केली, भाजप का संकुचित वृत्तीचा पक्ष असून, जातीवादी आणि धार्मिक राजकारण करीत आहे. तर कॉंग्रेसही भाजपपेक्षा काही वेगळा नसून, त्यांचीही वागणूक ही भाजपसारखीच आहे. त्यामुळे आपला पक्ष कोणत्याही गटात जाणार नसून, आगामी निवडणुका या स्वतंत्रपणे आणि पूर्ण ताकदीने लढू आणि जिंकू अशाही त्या या बैठकीत म्हणाल्या.
हेही वाचा : मोदींसारखा ‘सुपरमॅन’ पंतप्रधान आपल्याला लाभला असताना…, चीनवरून ठाकरे गटाचा टोला
पक्षाचं हित सर्वोपरी माना
पक्षाच्या बैठकीत बोलताना मायावती म्हणाल्या की, पुढील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील काही बदल करणे गरजेचे आहे. मात्र, मिळालेली जबाबदारी कमी अधिक असे समजू नका, काम करा आणि पक्षाचं हित सर्वोपरी माना असेही आवाहन त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना केले.