घरदेश-विदेशLoksabha 2024: सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत? रायबरेली मतदार संघातून 'या'...

Loksabha 2024: सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत? रायबरेली मतदार संघातून ‘या’ नेत्याला उमेदवारीची शक्यता

Subscribe

2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्या म्हणाली होत्या की त्या सार्वत्रिक निवडणूक लढवण्याची ही शेवटची वेळ आहे. त्यामुळे त्यांच्या रायबरेली या लोकसभा मतदारसंघातून कोण उभं राहणारं हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. परंतु, या जागेवर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी निवडणूक लढवणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. 

नवी दिल्ली: काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी सोमवारी लोकसभा निवडणुकीसाठी ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांसह जागावाटप आणि राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा केली. संभाव्य उमेदवारांमध्ये काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी आणि पक्षाचे खजिनदार अजय माकन यांची नावे आघाडीवर असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Loksabha 2024 Sonia Gandhi will not contest Loksabha elections Chance of candidacy for Priyanka Gandhi leader from Rae Bareli Constituency)

सोनिया गांधी यांना राजस्थान किंवा हिमाचल प्रदेशमधून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याचे म्हटलं जात आहे. संख्याबळानुसार, काँग्रेसला दोन्ही राज्यांतून प्रत्येकी एक राज्यसभेची जागा मिळेल. सोनिया गांधी यावेळी लोकसभा लढवणार नाहीत असं म्हटलं जात आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्या म्हणाली होत्या की त्या सार्वत्रिक निवडणूक लढवण्याची ही शेवटची वेळ आहे. त्यामुळे त्यांच्या रायबरेली या लोकसभा मतदारसंघातून कोण उभं राहणारं हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. परंतु, या जागेवर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी निवडणूक लढवणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

- Advertisement -

राज्यसभा निवडणुकीसाठी सोनिया गांधी यांना उमेदवारी दिल्यास, त्यांच्या संसदीय कारकिर्दीत त्या पहिल्यांदाच वरच्या सभागृहात जातील. सोनिया गांधी 1999 पासून लोकसभा सदस्य आहेत. 15 राज्यांमधील 56 जागांसाठी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी असून 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला सोनिया गांधी, पक्षाचे संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, पक्षाचे कोषाध्यक्ष अजय माकन आणि इतर काही नेते उपस्थित होते. काँग्रेस तामिळनाडूमधील DMK, झारखंडमधील JMM, बिहारमधील RJD आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) आणि शिवसेना (UBT) यासह इतर समविचारी पक्षांसोबत जागावाटपाची चर्चा अंतिम करत आहे.

- Advertisement -

जम्मू-काश्मीरमधील जागावाटपाबाबत काँग्रेसची नॅशनल कॉन्फरन्ससोबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले. काँग्रेसच्या नेत्यांकडून असा दावाही केला जात आहे का, सोमवारी पक्षाचा राजीनामा देणारे अशोक चव्हाण यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांची भेट घेतली होती आणि त्यांच्यावर तपास यंत्रणांकडून ‘प्रचंड दबाव’ असल्याचे सांगितले होते.

पक्षाचे खजिनदार अजय माकन यांना वरिष्ठ सभागृहात जाण्याची संधी मिळू शकते आणि कर्नाटकचे राज्यसभा सदस्य सय्यद नासिर हुसेन यांना पुन्हा उमेदवारी दिली जाऊ शकते, असंही म्हटलं जात आहे. काँग्रेसला कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करायची आहेत.

काँग्रेस बिहारमध्येही आपला एक उमेदवार घोषित करू शकतो. दरम्यान, राजस्थान विधानसभेतील विरोधी पक्षनेते टिका राम जूली यांनी सोनिया गांधी यांची राजस्थानमधून उमेदवारी जाहीर करण्याची विनंती हायकमांडला केली. अशा परिस्थितीत सोनिया गांधी राज्यसभेवर निवडून आल्यास त्यांच्या जागी प्रियंका गांधी यांना रायबरेली लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार केले जाण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा: Political News: काँग्रेसचे लातूर, चंद्रपूर आणि अमरावतीचे दिग्गज नेतेही भाजपात जाणार; ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -