नवी दिल्ली: शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांत असणारे सर्व ठग आता भाजपात गेले आहेत. त्यामुळे आम्ही ठगमुक्त झालो आहोत. यावेळी त्यांचा रोख उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांना वेगवेगळ्या घोटाळ्यांत मिळालेल्या क्लिन चिट संदर्भात होता.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आज इंडिया आघाडी महारॅली काढणार आहे. त्यासाठी देशभरातील दिग्गज नेते दिल्लीत एकवटले आहेत. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Loksabha 2024 We are thug free as all thugs go to BJP Attack of Uddhav Thackeray)
मविआत सर्व अलबेल
महाविकास आघाडीत समन्वय नाही? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला. त्यावर त्यांनी मग महायुतीत कुठे समन्वय आहे, असं उत्तर दिलं. मग महायुतीत समन्वय नाही तर महाविकास आघाडीत समन्वय नको का? असं पुन्हा विचारलं. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले आमच्यात समन्वय आहे. इतर उमेदवारांची घोषणा दोन-तीन दिवसांत जाहीर करणार आहोत. आता जागा वाटपावर चर्चा थेट 2029 मध्ये केली जाईल.
फडणवीसांनी मणिपूर, लडाखला जावं
राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील चित्रपट दाखवा. त्यासाठी संपूर्ण चित्रपटगृह मी बुक करतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितलं. या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांनी मणिपूर फाइल्स चित्रपट काढावा. तसंच, त्यांनी मणिपूर, लडाख, काश्मीरचा दौरा करावा. त्यासाठी लागणारा सर्व खर्च मी करतो, असंही उत्तर ठाकरेंनी यावेळी दिलं.
सर्व भष्ट लोक भाजपात
अटलबिहारी वाजपेयी यांच्या वेळेस असणारी भाजपा वेगळी होती. आताची भाजपा वेगळी आहे. आता भ्रष्ट असलेले सर्व लोक भाजपासोबत आले आहेत. भाजपाने ज्यांना ठग म्हटलंय अशी सगळी लोक आता भाजपात गेली आहेत. अजित पवार,प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक हे सगळे. त्यामुळे आता आमच्यासोबत असणारे पक्ष सध्या ठगमुक्त झाले आहेत.
(हेही वाचा: Loksabha 2024: अजूनही वेळ गेलेली नाही, उमेदवार बदला; हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवर भाजपा नाराज )