घरदेश-विदेशवायएसआरच्या जगनमोहन रेड्डी यांनी शरद पवारांशी बोलणं टाळलं

वायएसआरच्या जगनमोहन रेड्डी यांनी शरद पवारांशी बोलणं टाळलं

Subscribe

आंध्र प्रदेशमधील वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय.एस.जगन मोहन रेड्डी यांनी २३ मे नंतर काय करायचं? याचे पत्ते उघड केलेले नाहीत. एका बाजुला आंध्र प्रदेशचे तेलगू देसम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू हे देशभरात फिरून विरोधी पक्षांची जमवा जमव करत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार देखील आपल्या ज्येष्ठत्वाचा अनुभव वापरून विरोधी पक्षांशी संवाद साधत आहेत. जगनमोहन रेड्डी यांच्याशी सुद्धा शरद पवार यांनी टेलिफोनद्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तुर्तास तरी त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही. याबाबतचे वृत्त डेक्कन क्रोनिकल या वेबसाईटने दिले आहे. जगन मोहन रेड्डी यांनी कोणत्याही एका बाजुला न वळता निकालापर्यंत वाट पाहण्याचा निर्णय घेतलेला आहे, असे समजते.

एक्झिट पोलनुसार वायएसआर यांना आंध्र प्रदेशमध्ये सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लोकसभेत जर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तर रेड्डी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. आंध्रच्या तेलगू देसम पार्टीसोबत काँग्रेसचे बऱ्यापैकी सूत जुळले आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यासोबत वारंवार चर्चा होत आहेत. मात्र दुसऱ्या बाजुला वायएसआर काँग्रेसलाही जवळ घेण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्याकडून होताना दिसत आहे.

- Advertisement -

डेक्कन क्रोनिकलशी बोलताना वायएसआरचे वरिष्ठ नेते म्हणाले की, “शरद पवार यांनी जगनमोहन रेड्डी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रेड्डी यांच्याशी बातचीत होऊ शकली नाही. आम्हाला वाटतं ते निकालापर्यंत वाट पाहण्याच्या भूमिकेत आहेत.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -