घरदेश-विदेशLoksabha Election 2024 : उत्तर प्रदेशमध्ये तुटता-तुटता जुळल्या तारा; काँग्रेस- सपा एकत्र

Loksabha Election 2024 : उत्तर प्रदेशमध्ये तुटता-तुटता जुळल्या तारा; काँग्रेस- सपा एकत्र

Subscribe

समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. उत्तर प्रदेशात दोन्ही पक्ष एकत्र लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. दोन्ही पक्षांमध्ये अनेक दिवसांपासून आघाडीची चर्चा सुरू होती, मात्र जागावाटपावर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे परिस्थिती बिघडत असल्याचे दिसत होते.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे देशभर वाहण्यास सुरुवात झाली आहे. असे असतानाच उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेस आणि सपा हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. या आघाडीमध्ये काँग्रेस नेत्या राहुल गांधी यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. (Loksabha Election 2024 Broken lines in Uttar Pradesh Congress SP will fight elections together)

समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. उत्तर प्रदेशात दोन्ही पक्ष एकत्र लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. दोन्ही पक्षांमध्ये अनेक दिवसांपासून आघाडीची चर्चा सुरू होती, मात्र जागावाटपावर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे परिस्थिती बिघडत असल्याचे दिसत होते. मात्र अखेर दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात युतीची चर्चा कशी झाली हे जाणून घेणे मनोरंजक आहे. यात प्रियंका गांधी यांची मोठी भूमिका असल्याचे काँग्रेसमधील नेत्यांनी सांगितले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी यांनी आघाडीच्या चर्चेला सुरुवात केली होती. खासदार राहुल गांधींशी चर्चा केल्यानंतर अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केली. काँग्रेसने मुरादाबाद जागेची मागणी सोडून त्याऐवजी सीतापूर, श्रावस्ती आणि वाराणसीची मागणी केल्याने दोन्ही पक्षांमधील युतीची चर्चा पुढे सरकली. विश्वसनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधींशी बोलल्यानंतर प्रियंका गांधी यांनी अखिलेश यादव यांच्याशी फोनवर चर्चा केली. या चर्चेतच दोन्ही पक्षांमध्ये युती करण्याबाबत सहमती झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : Nana Patole : महायुती सरकार तरुणाईला धर्माची अफू, ड्रग्जचे विष देऊन बर्बाद करतंय – नाना पटोले

- Advertisement -

या जागांवर लढू शकते काँग्रेस

काँग्रेस अमेठी, रायबरेली, प्रयागराज, वाराणसी, महाराजगंज, देवरिया, बांसगाव, सीतापूर, अमरोहा, बुलंदशहर, गाझियाबाद, कानपूर, झाशी, बाराबंकी, फतेहपूर सिक्री, सहारनपूर आणि मथुरा येथून निवडणूक लढवू शकते असे सांगण्यात येत आहे. यापूर्वी 2017 च्या यूपी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र आले होते. तेव्हा या आघाडीसाठी बॉईज ऑफ यूपीचा नारा देण्यात आला. मात्र, निवडणुकीत या आघाडीचा दारूण पराभव झाला होता. समाजवादी पक्षाला 47 तर काँग्रेसला फक्त 7 जागा मिळाल्या होत्या. तर 2019 ची लोकसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढवली होती. त्यावेळी समाजवादी पक्षाला येथे 80 पैकी केवळ 5 जागा जिंकता आल्या होत्या. काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली.

हेही वाचा : Manoj Jarange : तो काही तुझा पणजोबा नाही; जरांगेंची भुजबळांवर अप्रत्यक्ष टीका

भारत न्याय जोडो यात्रेत होणार सहभागी

राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी न होण्याबाबत अखिलेश यादव यांना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, आमच्या सर्वकाही ठीक आहे, आघाडी होणारच होती. आमच्यात कुठलाही वाद नाही. यापूर्वी सोमवारी अखिलेश यादव यांनी जागावाटपाचा मुद्दा निश्चित झाल्यानंतर राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी होणार असल्याचे सांगितले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -