नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजू शकते. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची गुरुवारी (29 फेब्रुवारी) रात्री 11 वाजताच्या सुमारास बैठक होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जे. पी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपाच्या अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीत लोकसभेसाठी 100 ते 150 उमेदवारांच्या यादी तयार करण्यात आली असून येत्या दोन दिवसांत उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यात वर्तवली जात आहे.
या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. तर अमित शहा हे गुजरात येथील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून लढणार, केंद्री मंत्री नितीन गडकरी हे नागपूर, पूर्वी मुंबईतून पियुष्य गोयल, हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून अनुराग ठाकूर यांच्या निश्चित झाल्याचे मानले जाते.
हेही वाचा – Gokhale Bridge : गोखले पुलाच्या कामात पालिकेकडून मोठी चूक; चालकांना मनस्ताप, जबाबदारीबाबत टाळाटाळ
भाजपाच्या संभाव्य उमेदवारांची अशी आहे यादी
- वाराणसी- नरेंद्र मोदी
- गांधी नगर – अमित शहा
- नागपूर- नितीन गडकरी
- पूर्व मुंबई- पियुष गोयल
- संभवपूर- धर्मेंद्र प्रधान
- हमीरपूर- अनुराग ठाकूर
- अमेठी – स्मृती इराणी
- बेगुसराय- गिरीराज सिंह
- आरा- आर के सिंग
- अरुणाचल पश्चिम – किरण रिजू
- मोहनलालगंज- कौशल किशोर
- सिकंदराबाद- जी के रेड्डी
- भिवानी- भूपेंद्र यादव
- मिर्झापूर- अनुप्रिया पटेल
- मुझफ्फरनगर – संजीव बल्यान
- आग्रा- डॉ.एस.पी.सिंग बघेल
- गुरुग्राम- राव इंद्रजित सिंग
- दिब्रुगड- सर्बानंद सोनेवाल
- बंडायु- बीएल वर्मा
- धारवाड- प्रल्हाद जोशी
- भावनगर – मनसुख मडाविया
- जोधपूर- गजेंद्र सिंह शेखावत