घरदेश-विदेशLoksabha Election : भाजपा जिंकल्यावर लाकडे गोळा करावी लागतील; ममतांनी सांगितले कारण...

Loksabha Election : भाजपा जिंकल्यावर लाकडे गोळा करावी लागतील; ममतांनी सांगितले कारण…

Subscribe

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची कधीही घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातही राजकीय पक्षानी कंबर कसली आहे. इंडिया आघाडीसह एनडीएकडून जागावाटपासंदर्भात बैठका होत आहेत. अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (29 फेब्रुवारी) मोठा दावा केला. केंद्रात भाजपाची सत्ता आल्यास सरकार प्रत्येक एलपीजी सिलिंडरची किंमत 2 हजार रुपयांपर्यंत वाढेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. (Loksabha Election When BJP wins wood will have to be collected Mamata Banerjee said because)

हेही वाचा – Sharad Pawar : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पवारांकडून जेवणाचे निमंत्रण; अजितदादा जाणार?

- Advertisement -

ममता बॅनर्जी आज झारग्राम जिल्ह्यातील एका सरकारी कार्यक्रमात उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी मेळाव्याला संबोधित करताना दावा केला की, जर भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुका जिंकला तर ते एलपीजी सिलिंडरची किंमत 1,500 किंवा 2,000 रुपयांपर्यंत वाढवतील. त्यामुळे आपल्याला आग लावण्यासाठी लाकूड गोळा करण्याची जुनी प्रथा अंगीकारावी लागेल. याचवेळी त्यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला गृहनिर्माण योजनेंतर्गत घरांचे बांधकाम एप्रिलच्या अखेरीस पूर्ण करण्याचा इशारा दिला आणि तसे न झाल्यास त्यांचे सरकार (ममता बॅनर्जींचे सरकार) मे महिन्यापासून बांधकाम सुरू करेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

ममता बॅनर्जींनी शाहजहान शेखबद्दल बोलणं टाळलं

संदेशखळी भागात महिलांचा लैंगिक छळ आणि जमीन बळकावल्याप्रकरणी पक्षाचे नेते आरोपी शाहजहान शेख याच्या अटकेवर ममता बॅनर्जी बोलणं टाळलं. शाहजहान शेख याला आजच अटक करण्यात आली आहे. मात्र शाहजहान शेख यांच्या झालेल्या आरोपांप्रकरणी तृणमूल काँग्रेसने त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. 55 दिवस फरार राहिल्यानंतर शाहजहान शेख याला आज पहाटे अटक करण्यात आली. शेख फरार असताना उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखळी येथे महिलांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली होती. शेखच्या अटकेची मागणी महिला सातत्याने करत होत्या. संदेशखळी विधानसभा मतदारसंघाचे पक्ष संयोजक शेख हे उत्तर 24 परगणा जिल्हा परिषदेचे सदस्य देखील आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Congress : नाना पटोलेंवर पदाधिकारी नाराज; 12 सदस्य पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीला

भाजपा पुन्हा सत्तेत येणार?

दरम्यान, निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर करू शकतो. याआधी सर्वच पक्ष वेगवेगळ्या मुद्द्यांवर भर देताना दिसत आहेत. ममता बॅनर्जी यांनी गॅस सिलिंडर आणि महागाईच्या मुद्द्याला महत्व देण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे राहुल गांधीही बेरोजगारी आणि महागाईचे प्रश्न सातत्याने मांडत आहेत. त्यामुळे आता निवडणुकीनंतरच समजले जनता भाजपाला पुन्हा सत्तेत आणणार की, विरोधकांना संधी देणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -