Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 नॅक मूल्यांकन आवश्यक, अन्यथा महाविद्यालयांवर होणार 'ही' कारवाई

नॅक मूल्यांकन आवश्यक, अन्यथा महाविद्यालयांवर होणार ‘ही’ कारवाई

Subscribe

नॅक मूल्यांकन प्राप्त न केलेल्या महाविद्यालयांना अनुदान, संलग्नता मंजूर करण्यात येणार नाही असे सरकारकडून लोकसभेत लेखी उत्तरात सांगण्यात आले आहे.

राज्यातील ३ हजार ३४६ वरीष्ठ महाविद्यालयांपैकी फक्त १ हजार ९७३ वरीष्ठ महाविद्यालयांनी नॅक मुल्यांकन प्राप्त केले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ज्या महाविद्यालयांनी नॅक मुल्यांकन घेतलेले नाही त्या महाविद्यालयांवर लवकरच कारवाई केली जाणार आहे. नॅक मुल्यांकन न घेतलेल्या महाविद्यालयांवर कारवाई होणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. तारांकित प्रश्नावर सरकारने हे लेखी स्वरुपात हे उत्तर दिले आहे. नॅक मुल्यांकन प्राप्त न केलेल्या महाविद्यालयांना अनुदान, संलग्नता मंजूर करण्यात येणार नाही, असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई आणि पनवेलमधील ६६८ पैकी फक्त २७३ महाविद्यालयांनी नॅक मुल्यांकन प्राप्त केले आहेत. सर्वांत कमी नॅक मुल्यांकन प्राप्त महाविदयालय मुंबई आणि पनवेलमध्ये आहेत.

- Advertisement -

राज्यात असलेल्या 3 हजार 346 वरिष्ठ महाविद्यालयांपैकी फक्त 1 हजार 973 वरीष्ठ महाविद्यालयांनी नॅक मुल्यांकन प्राप्त केले आहे. यात मुंबई आणि पनवेलमध्ये असणा-या वरीष्ठ महाविद्यालयांच्या एकूण संख्येच्या तुलनेत नॅक मूल्यांकन प्राप्त महाविद्यालयांची संख्या अर्ध्याहून कमी आहे.

नॅक मूल्यांकन हे महाविद्यालयांच्या संलग्नतेसाठी महत्त्वाचे

मुंबई आणि पनवेलमधील 668 वरिष्ठ महाविद्यालये आहेत. यापैकी फक्त 273 महाविद्यालयांनी नॅक मुल्यांकन प्राप्त केले आहेत. सर्वांत कमी मूल्यांकन प्राप्त महाविद्यालय मुंबई आणि पनवेलमध्ये आहेत. नॅक मूल्यांकन हे महाविद्यालयांच्या संलग्नतेसाठी महत्त्वाचे ठरते. जर नॅक मुल्यांकन महाविद्यालयांना मिळाले नाही तर अनुदान आणि संलग्नता मंजूर करता येणार नाही. नॅक मूल्यांकन न घेतलेल्या महाविद्यालयांवर कारवाई होणार असल्याचेही राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.

31 मार्चपर्यंत मुदत, अन्यथा…

- Advertisement -

राज्यातील तब्बल 60 टक्के महाविद्यालयांनी नॅकचे मुल्यांकन केले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने येत्या शैक्षणिक वर्षापासून नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, गुवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे त्या दृष्टीकोनातून यासर्व प्रक्रिया सर्व महाविद्यालयांनी पार पाडणे आवश्यक असल्याचे या आदेशात सांगितले आहे. राज्यातील विनाअनुदानिक 2141 महाविद्यालयांपैकी केवळ 138 महाविद्यालयांचे मूल्यांकन पुनर्मूलयांकन पूर्ण झाल्याचे समोर आल्याने उच्चतंत्र शिक्षण विभागाने या विषयी गंभीर होऊन निर्देश दिले आहेत.

- Advertisment -