Loksabha : मणिपूर हिंसाचार (Manipur Violence) प्रकरणी विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. या प्रस्तावावर आज (10 ऑगस्ट) आज तिसऱ्या दिवशीही लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी मणिपूरच्या प्रश्नावरून केंद्र सरकारवर बोचरी टीका केली. समाजात पसरलेल्या धार्मिक वैमनस्यामुळे आज भाजीपाला हिंदू आणि बकरा मुस्लिम झाला आहे, असे महुआ मोईत्रा म्हणाल्या. (Loksabha Vegetal Hindus and Goat Muslims Mahua Moitra criticizes Modi government in Manipur case)
मोदी सरकारवर हल्लाबोल करताना महुआ मोईत्रा म्हणाल्या की, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा प्रस्ताव आणण्यात आला आहे. परंतु पंतप्रधान मोदी आमचे ऐकणार नाहीत. शेवटच्या दिवशी येऊन ते भाषण करतील. पण आपल्या पंतप्रधानांनी संसदेत येण्यास नकार दिला किंवा त्यांनी मणिपूरला जाण्यास नकार दिला, याहून दुर्दैवी काय ते मला माहीत नाही, असे म्हणत महुआ मोईत्रा यांन नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
#WATCH | TMC MP Mahua Moitra says “India has lost confidence in you (PM Modi). The spectacle of the prime minister of the greatest democracy bowing to religious Seers of a majority in the chamber of the new Parliament fills us with shame, police manhandling and filing FIRs… pic.twitter.com/BBFMVIqExC
— ANI (@ANI) August 10, 2023
मणिपूरमधील हिंसाचार डबल इंजिन सरकारचे मोठे अपयश
मणिपूर हिंसाचारप्रकरणी बोलताना महुआ मोईत्रा यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्या म्हणाल्या की, कोणत्या राज्यात पाच पोलीस ठाण्यांमधून पाच हजार बंदुका आणि सहा लाख गोळ्या लुटल्या गेल्या आहेत? कोणत्या राज्यात असे घडले आहे की, दोन भागांमध्ये बफर झोन तयार करावा लागला? डोंगरावरील लोक दरीत जाऊ शकत नाहीत आणि दरीतील लोक डोंगरावर जाऊ शकत नाहीत? कोणत्या राज्यात जंगल कमी झाले आहे? हे सर्व मणिपूरमध्ये घडले असून हे डबल इंजिन सरकारचे सर्वात मोठे अपयश आहे, असे महुआ मोईत्रा म्हणाल्या.
हेही वाचा – PM Modi : ‘मणिपूरवर चर्चा होऊ शकली असती, पण…’; मोदींनी विरोधकांवर केला हल्लाबोल
भाजीपाला हिंदू अन् बकरा मुस्लिम
समाजात पसरलेल्या धार्मिक वैमनस्यावर महुआ म्हणाले की, भाजीपाला हिंदू आणि बकरा मुस्लिम झाला आहे. समाजात असे वातावरण निर्माण झाले आहे. एक समाज दुसऱ्या समाजावर गुन्हे करत असून पीडितांना न्यायही मिळत नाही, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला.