घरदेश-विदेशLoksabha: महाराष्ट्रात जे झालं तेच जम्मू काश्मीरबाबत करणार का? सुप्रिया सुळेंचा मोदी...

Loksabha: महाराष्ट्रात जे झालं तेच जम्मू काश्मीरबाबत करणार का? सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारला सवाल, म्हणाल्या…

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मोदी सरकारला जम्मू काश्मीरमधील निवडणुकांवरून प्रश्न विचारले आहेत.

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मोदी सरकारला जम्मू काश्मीरमधील निवडणुकांवरून प्रश्न विचारले आहेत. इतकचं नाही तर जी स्थिती महाराष्ट्राची आहे तिच जम्मू काश्मीरची करणार का? असा सडेतोड प्रश्न सुळेंनी लोकसभेत उपस्थित केला आहे. (Loksabha What happened in Maharashtra will they do to Jammu and Kashmir Supriya Sule s question to the Modi government said )

जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर परिस्थिती वेगाने सुधारत असल्याचा मुद्दा पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी लोकसभेत मांडला. यावर बोलताना, सुप्रिया सुळे यांनी आपलं मत व्यक्त करत, मोदी सरकारला परखड प्रश्न विचारले आहेत.

- Advertisement -

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तुम्ही जम्मू-काश्मीरमध्ये करत असलेल्या चांगल्या गोष्टींचं मी कौतुक करते. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंचायत राज सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी आणलं होतं. ही चांगलीच बाब आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण झालंच पाहिजे. पण आज जम्मू-काश्मीरचे लोक दोन गोष्टी मागत आहेत. पहिली म्हणजे स्वतंत्र राज्याचा दर्जा आणि दुसरी म्हणजे राज्यात निवडणुका. सरकार यासंदर्भात तारखेसह काही वेळापत्रक देऊ शकतं का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.

सुळे म्हणाल्या की, जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका कधी घेतल्या जाणार? आम्हाला हवेत उत्तर नको. तीन महिन्यांत वगैरे सांगितलं तरी चालेल. तुम्ही तारीख देऊ शकत नाही, निवडणूक आयोग देऊ शकेल हे मला माहिती आहे. पण किमान तुम्ही काही ढोबळ कालावधी तरी देऊ शकता. एवढं तर तुम्ही करू शकता. शिवाय लडाखला लोकप्रतिनिधी सभागृह हवं आहे. त्यांची ती मागणी पूर्ण केली जाणार आहे का? सरकारचं त्यासंदर्भात काय नियोजन आहे? अशी विचारणा सुळेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली.

- Advertisement -

(हेही वाचा: Rahul Gandhi : ‘भाजपाने दिवस मोजायला सुरुवात करावी’, राहुल गांधींनी जातीय जनगणनेच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांवर साधला निशाणा )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -