Thursday, June 10, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग जगातल्या सर्वाधिक काळ पद भूषवणाऱ्या पंतप्रधानांचं निधन, ४९ वर्ष होते पदावर!

जगातल्या सर्वाधिक काळ पद भूषवणाऱ्या पंतप्रधानांचं निधन, ४९ वर्ष होते पदावर!

Related Story

- Advertisement -

जगात सर्वाधिक काळ एखाद्या देशाच्या प्रमुखपदी राहिलेल्या व्यक्तींच्या यादीत बहारिनचे पंतप्रधान प्रिन्स खलीफा बिन सलमान अल खलीफा यांचं नाव सर्वात वर घ्यावं लागले. तब्बल ४९ वर्षांपासून प्रिन्स खलीफा बहारीनचे पंतप्रधान होते. मात्र, बुधवारी त्यांचं निधन झालं. १९७१ मध्ये बहारीन स्वतंत्र झाल्यापासून प्रिन्स खलीफाच बहारीनचे पंतप्रधान होते. वयाच्या ८४व्या वर्षी त्यांचं निधन झालं. अमेरिकेत एका मल्टिस्पेशालिटि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बहारीनच्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीने त्यांच्या निधनाची घोषणा केली आहे. बहारीन न्यूज एजन्सी अर्थात बीएनएनने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. प्रिन्स खलीफा यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर बहारीनमध्ये एक आठवड्याच्या शोक सप्ताहाची घोषणा करण्यात आली आहे.

२०११मध्ये आखाती देशांमध्ये आलेल्या अरब क्रांतीमध्ये प्रिन्स खलीफा यांचं नाव वादात सापडलं होतं. क्रांतीदरम्यान खलीफा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते. त्यांनी पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावं, अशी मागणी जोरकसपणे करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर देखील ते पदावर राहिले. अखेर बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

- Advertisement -

प्रिन्स खलीफा हे बहारीनचे एकमेव प्रमुख राहिल्यामुळे बहारीनमध्ये सर्व सरकारी कार्यालयांमध्ये त्यांचेच फोटो दिसतात. त्यांच्या मालकीचं एक बेट देखील होतं. या बेटावर ते सरकारी पाहुण्यांच्या भेटीगाठी घेत असत.

- Advertisement -