‘इतकी’ आहे तिरुपती बालाजी देवस्थानाची संपत्ती; सोनं, मालमत्ता आणि ठेवी जाहीर

एका वृत्तवाहिनीला तिरुपती मंदिराचे चेअरमन वाय वी सुब्बा रेडी यांनी दिलेल्या माहितीमध्ये तिरुपती बालाजी देवस्थानाबाबत माहिती देण्यात आली आहे. देशात देवस्थानाच्या 960 मालमत्ता आहेत. या मालमत्तांची किंमत 85,705 कोटी रुपये आहे.

Tirumala Tirupati Devasthanams issue more ssd tokens tickets

देशभरात शिर्डी, तिरुपती बालाजी, वेष्णव देवी, केदारनाथ, श्री सिद्धिविनायक यांसारखी बरीच मोठी मंदिर आहेत. अनेकांना या मदिरांची संपत्ती किती असेल, अशा प्रश्न पडतो. नुकताच तिरुपती बालाजी देवस्थानाची संपत्ती जाहीर करण्यात आली आहे. देशात देवस्थानाच्या 960 मालमत्ता आहेत. या मालमत्तांची किंमत 85,705 कोटी रुपये आहे. (Lord Venkateshwara Tirupati Balaji Properties Across India Worth Rs 85705 Crore)

एका वृत्तवाहिनीला तिरुपती मंदिराचे चेअरमन वाय वी सुब्बा रेडी यांनी दिलेल्या माहितीमध्ये तिरुपती बालाजी देवस्थानाबाबत माहिती देण्यात आली आहे. देशात देवस्थानाच्या 960 मालमत्ता आहेत. या मालमत्तांची किंमत 85,705 कोटी रुपये आहे. 1174 ते 2014 सालादरम्यान वेगवेगळ्या सरकारच्या अंतर्गत मंदिर समितीने 113 मालमत्ता निकाली काढल्या आहेत. मात्र, 2014 नंतर एकाही मालमत्तेची विक्री केली नाही.

तिरुपती बालाजी देवस्थान देशातल्या श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. देश-विदेशातून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या मंदिराला मोठ्या प्रमाणात भाविक देगण्याही देत असतात. त्यामुळे मंदिराच्या संपत्तीची नेहमी चर्चा केली जाते. त्यात आता मंदिर प्रशासनाने आपली संपत्ती आणि मालमत्ता जाहीर केली आहे.

दरम्यान, तिरूपती बालाजी देवस्थानाची विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये 14 हजार कोटींहून अधिक रुपयांच्या ठेवी आहेत. तर, 14 टन सोन्याचा साठाही देवस्थानाकडे आहे. त्यामुळे तिरूपती बालाजी देवस्थान जगातील सर्वांत श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते.


हेही वाचा – राज्यात रविवारी कोरानाचे 541 नवे रुग्ण, 546 जणांची मात