घरCORONA UPDATEसावधान- 'करोना' हसण्यातूनही पसरतोय

सावधान- ‘करोना’ हसण्यातूनही पसरतोय

Subscribe

जर सुखी आणि समाधानी राहण्याबरोबरच आनंदीही राहायच असेल तर हसायलाच पाहीजे. हसल्यामुळे मन प्रसन्न राहत. त्यामुळे आरोग्यही ठणठणीत राहतं. असा सल्ला सगळेच डॉक्टर देतात. पण आता करोनामुळे सगळ जगच हसणं विसरलेलं असतानाच अजून एक धक्कादायक खुलासा नवी दिल्लीतील एम्स या रुग्णालयाने केला आहे. जे वाचून तुमचं उरल सुरलं हसूही नक्कीच आटणार आहे. कारण नवीन संशोधनानुसार हसल्यामुळेही करोनाची लागण होऊ शकते.

करोनाग्रस्त व्यक्ती कळत किंवा नकळत मोठ्यांदा हसल्यास त्यांच्या तोंडातील लाळेचे थेंब बिंदूंच्या रुपातून बाहेर उडतात. ज्यामुळे समोरील व्यक्तीच्या कपड्यांवर किंवा वस्तूंवर करोना व्हायरस थेट पोहचतो. यामुळे करोनाची लागण झालेल्या किंवा तशी लक्षण असलेल्या व्यक्तींपासून दोन हात लांब राहण्याचा सल्ला एम्सने दिला आहे. त्याचबरोबर काही मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासही जनतेला सांगितले आहे.

- Advertisement -

ICMR-AIIMS या संस्थानी मिळून ही नवीन मार्गदर्शक सूचनावली तयार केली आहे. यात करोनाग्रस्तांपासून लांब राहा. तसेच शिंक आल्यास नाकासमोर रुमाल पकडा. जेणेकरुन त्यातील द्रव बाहेर पडणार नाही.

तसेच करोनाग्रस्त किंव संशयित व्यक्तींनीही घरातील लादी नियमित स्वच्छ करावी.

- Advertisement -

घरातील फर्निचर टेबल, खुर्च्या, पंखे यांची रोज सफाई करा. प्रत्येकाला हात स्वच्छ करण्याची सक्ती करा .

मद्य व धूम्रपान करणे टाळा.

तुमच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीला रोज हात नीट साबणाने स्वच्छ धुवावेत असे सांगितले आहे.

मधुमेही व्यक्तींनी साखर खाणे टाळावे.

तसेच उच्चरक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी मीठ खाणे बंद करावे.

असा सल्ला एम्सच्या रुग्णालय प्रशासनाने दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -