घरदेश-विदेशपतौडी घराण्याने लव्ह जिहादच बीज पेरलं, शर्मिला टागोरने याची सुरुवात केली

पतौडी घराण्याने लव्ह जिहादच बीज पेरलं, शर्मिला टागोरने याची सुरुवात केली

Subscribe

रविवारी झालेल्या महापंचायतमध्ये भाषण देतांना सूरजपाल अमू यांनी पतौडी घराण्यानेच लव्ह जिहादचं बीज पेरलं असून, शर्मिला टागोरपासून हे सुरू आहे

देशभरामध्ये सध्या सगळीकडेच धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या घटनेमुळे गंभीर वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे अनेकदा राजकारणात याचे गंभीर पडसाद उमटले आहेत. जागोजागी या  चर्चेमुळे लोकांमध्ये भीतीचे तसेच असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचदरम्यान हरयाणामधील भाजपाचे प्रवक्ते तसेच करणी सेनेचे अध्यक्ष सूरजपाल अमु यांची गुरगावमध्ये रविवारी महापंचायत पार पडली. या पंचायतीत लव्ह जिहाद, धर्मांतर आणि लोकसंख्या नियंत्रण कायद्यावर चर्चा झाली. याचदरम्यान बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानसह पतौडी घराण्यावर निशाना साधत गंभीर आरोप करत सूरजपाल अमू यांनी पतौडी घराण्याला टोला लगावला आहे. रविवारी झालेल्या महापंचायतमध्ये भाषण देतांना सूरजपाल अमू यांनी पतौडी घराण्यानेच लव्ह जिहादचं बीज पेरलं असून, शर्मिला टागोरपासून हे सुरू आहे. अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी सभेदरम्यान केलं तसेच त्यांनी अभिनेत्री करिना कपूर खानचं नाव न घेता पतौडी घराण्यावर तोफ डागली आहे.( love jihad started by Sharmila Tagore  Pataudi family)

पंचायतीदरम्यान सूरजपाल यांनी म्हंटलं आहे की ”पतौडी लव्ह यांनीच लव्ब जिहादची सुरूवात केली आहे. ठाकूर साहेब इथे बसलेले आहेत. जेव्हा पतौडी संस्थानाच्या नवाबांचं निधन झालं, तेव्हा त्यांना फेटा बांधऱ्यामध्ये तेही होते. दुसऱ्याचा सन्मान ठेवणं आम्हाला माहिती आहे.ज्यांनी तैमूरला जन्म दिला, ते सुद्धा पतौडी घराण्यातीलच आहेत. हे पुरे झालं, इतकीच विनंती आम्हाला तैमूरच्या आईला करायची आहे. हा लव्ह जिहाद शर्मिला टागोरांपासून सुरू आहे. पतौडी लोकच हे थांबवू शकतात. त्यांचं स्वागत करणं बंद करा.” असं सूरज पाल अमू यांनी वक्तव्य केलं आहे.

- Advertisement -


हे हि वाचा – आमिर-किरणच्या घटस्फोटानंतर कंगनाने केला सवाल.. मुस्लिम व्यक्तीशी लग्न करण्यासाठी धर्म का बदलावा?



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -