घरदेश-विदेशपाऊस कमी झाल्यामुळे 'सुपर एल निनो'चे देशावर सावट; असा होणार बदल

पाऊस कमी झाल्यामुळे ‘सुपर एल निनो’चे देशावर सावट; असा होणार बदल

Subscribe

मुंबई : यंदा देशात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे उन्हाळ्यात ‘सुपर एल निनो’चा प्रभाव असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. यामुळे पुढच्या वर्षी मार्च ते मेदरम्यान ‘सुपर एल निनो’चा प्रभाव दिसणार आहे. यामुळे सरासरी तापमान 1.5 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असणार आहे. तर सरासरी तापमान 2 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असल्याची शक्यात हवामान विभागाने सांगितले आहे.

प्रशांत महासागारातील ‘एल-निनो’ची स्थिती वाढल्यामुळे हा परिमाण होत आहे. अमेरिकेमधील नॅशनल ओशनिक अॅण्ड अॅटमोस्फेरिक एडमिनिस्टेशन या संस्थेने हा अंदाज वर्तवला असल्याची माहिती पुणे हवामान वभागाने दिली आहे. यापूर्वी देशात ‘सुपर एल निनो’चा प्रभाव हा 1997-98मध्ये होता. यानंतर 2015-16 मध्ये ‘सुपर एल निनो’चा प्रभाव होता. यामुळे दुष्काळ, तापमना आणि पूर यासारख्या आपत्ती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे भारतातील मॉन्सूनवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Same Sex Marriage : निर्णय घेणार संसद, सुप्रीम कोर्टाकडून केंद्राला महत्त्वाचे आदेश

हवामानावर असा होणार परिणाम

भारतीय हवामानावर ‘सुपर एल निनो’चा मोठा बदल होण्याचा धोका असल्याचे हवामान विभागाने म्हटले असून काही भागात मुसळधार पाऊस पडतो. तर काही भागात तापमानात वाढ होते. या काळात पावसाचे प्रमाण कमी होते. उत्तर भारात सुपर एल निनोचा धोका दक्षिण भारतापेक्षा अधिक आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – मध्य प्रदेशमधील काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, कमलनाथांच्या विधानाने खळबळ

यंदा पाऊसाने मारली दांडी

राज्यात 7 जून रोजी मॉन्सून दाखल होणार होता. पण मॉन्सून 25 जून रोजी दाखल झाला होता. यानंतर जुलै महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाला होता. पण राज्यात मॉन्सूनहा ऑगस्ट महिन्यात तब्बल 21 दिवस दांडी मारली होती. तर सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला. यंदा राज्यात जून ऑगस्ट महिन्यात पुरेसा पाऊस झाला नव्हता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -