घरताज्या घडामोडीLPG Price Hike: गृहिणींचे बजेट कोलमडणार, घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला

LPG Price Hike: गृहिणींचे बजेट कोलमडणार, घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला

Subscribe

पेट्रोल-डिझेलचे दर ४ नोव्हेंबरपासून स्थिर होते. तसेच घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर ६ ऑक्टोबर २०२१ पासून बदलले नव्हते.

रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढल्याचा परिणाम आता देशांतर्गत दिसून येत आहे. तेल विपणन कंपन्यांनी आज, मंगळवारी घरगुती गॅस सिलिंडरचे (LPG Cylinder) दर वाढवले आहेत. यापूर्वी कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर ८० पैशांपेक्षा अधिक प्रति लीटर वाढवले होते. तसेच काही दिवसांपूर्वी दुध कंपन्यांनी दुधाचे दर २ ते ५ रुपये प्रति लीटर वाढले होते. त्यामुळे आता या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार असून यामुळे गृहिणींचे बजेटही कोलमडणार आहे.

- Advertisement -

गॅस सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढले

१४.२ किलोग्रॅमचा घरगुती एलपीजी सिलिंडर (LPG Cylinder) आजपासून ५० रुपयांनी महागला आहे. बऱ्याच महिन्यांनंतर एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर ६ ऑक्टोबरला २०२१ला बदलले होते. आता राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत वाढून ९४९.५ रुपये झाली आहे. यापूर्वी ८९९.५० रुपये होती.

या शहरांमध्ये इतके महागले गॅस सिलिंडर

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत वाढून ९७६ रुपये झाली आहे. यापूर्वी कोलकातामध्ये गॅस सिलिंडरची किंमत ९२६ रुपये होती. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सिलिंडरची किंमत ९३८ रुपयांवरून वाढून ९८७.५ रुपये झाली आहे. तर पटनामध्ये १४.२ किलोग्रॅमच्या गॅस सिलिंडरची किंमत १०४७.५ रुपये झाली आहे. मायानगरी मुंबईत आता सिलिंडरची किंमत ९४९.५ रुपये झाली असून यापूर्वी ८९९.५ रुपये होती. तसेच चेन्नईमध्ये गॅस सिलिंडरची किंमत ९६५.५ रुपये झाली आहे.

- Advertisement -

यामुळे वाढले दर

बऱ्याच दिवसांपासून पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी सिलिंडरचे दरात कोणताही बदल झाला नव्हता. पेट्रोल-डिझेलचे दर ४ नोव्हेंबरपासून स्थिर होते. तसेच घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर ६ ऑक्टोबर २०२१ पासून बदलले नव्हते. दुसऱ्या बाजूला रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलातील दरात ४० टक्क्यांनी वाढ झाली होती. कच्च्या तेलाची ही महागाई ग्राहकांपर्यंत पोहोचवणे तेल विपणन कंपन्यांना गरजेचे झाले होते. त्यामुळे आज सकाळी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली.


हेही वाचा – Petrol-Diesel Price Today: साडेचार महिन्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या प्रति लीटर दर


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -