घरअर्थजगतव्यावसायिकांना दिलासा! सिलिंडरच्या दरात आतापर्यंत ३७८ रुपयांनी घट, नवे दर पाहा

व्यावसायिकांना दिलासा! सिलिंडरच्या दरात आतापर्यंत ३७८ रुपयांनी घट, नवे दर पाहा

Subscribe

सध्या १९ किलोग्रॅम सिलिंडरची किंमत मुंबईत १९३६ रुपये झाली आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडणाऱ्या एलपीजी सिलिंडरच्या दरांत आज घट झाली आहे. मात्र, आज फक्त व्यावसायिक सिलिंडरमध्ये घट झाली असून घरगुती एलपीजी ग्राहकांना दिलासा मिळालेला नाही. व्यावसायिक एलपीजी सिंलिंडर ३६ रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे सध्या १९ किलोग्रॅम सिलिंडरची किंमत मुंबईत १९३६ रुपये झाली आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत. (LPG gas cylinder new rate declare decreases by 36 rupees)

कालपर्यंत हाच सिलिंडर २०१२ रुपयांनी विकला जात होता. गेल्यावेळी ६ जुलै २०२२ रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये ९ रुपायंची कपात करण्यात आली होती. तर, १ जुलै रोजी तब्बल १९८ रुपयांनी व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त झाला होता. त्याआधी २०२२ रुपयांनी सिलिंडर विकला जात होता.

- Advertisement -

हेही वाचा – ऑगस्टपासून होणार ‘हे’ पाच मोठे बदल, आताच जाणून घ्या!

गेल्या तीन महिन्यात चार वेळा दरांत कपात करण्यात आली आहे. १ जूनपासून १९ किलोग्रॅमचे सिलिंडर स्वस्त झाले. जूनपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर ३७८ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

- Advertisement -

इतर शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर

  • दिल्ली – १९७६.५० रुपये
  • कोलकत्ता – २०९५.५० रुपये
  • मुंबई – १९३६.५० रुपये
  • चैन्नई – २१४१ रुपये

हेही वाचा – आयटीआर दाखल करण्यासाठी वेळ वाढवून देण्यास केंद्राचा नकार, काय आहे कारण?

दरम्यान, व्यावसायिक सिलिंडर दरात कपात झालेली असली तरीही घरगुती सिलिंडरमध्ये कोणतीही कपात झालेली नाही. गेल्या महिन्यात ५० रुपयांनी गॅस सिलिंडरमध्ये वाढ करण्यात आली होती.

इतर शहरात घरगुती गॅस सिलिंडरचे दर

  • दिल्ली – १०५३ रुपये
  • कोलकत्ता – १०७९ रुपये
  • मुंबई १०५२.५० रुपये
  • चैन्नई १०६८.५० रुपये
Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -