घरदेश-विदेशLPG Price : हॉटेल व्यावसायिकांसाठी खुशखबर, LPG सिलिंडर झाले स्वस्त

LPG Price : हॉटेल व्यावसायिकांसाठी खुशखबर, LPG सिलिंडर झाले स्वस्त

Subscribe

दिवाळीपूर्वी व्यवसायामध्ये वापरण्यात येणाऱ्या एलपीजी सिलिंडरच्या दरामध्ये वाढ करण्यात आली होती. ज्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसला होता. परंतु, आता दिवाळीनंतर हे दर पुन्हा कमी करण्यात आले असून तेल कंपन्यांनी आज (ता. 16 नोव्हेंबर) सिलिंडरच्या किमती कमी केल्याची घोषणा केली आहे.

मुंबई : दिवाळीपूर्वी व्यवसायामध्ये वापरण्यात येणाऱ्या एलपीजी सिलिंडरच्या दरामध्ये वाढ करण्यात आली होती. ज्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसला होता. 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल 101.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. परंतु, आता दिवाळीनंतर हे दर पुन्हा कमी करण्यात आले असून तेल कंपन्यांनी आज (ता. 16 नोव्हेंबर) सिलिंडरच्या किमती कमी केल्याची घोषणा केली आहे. आजपासून या किंमतीत 57.5 रुपये कमी करण्यात आले आहेत. (LPG Price: Good news for hoteliers, LPG cylinders have become cheaper)

हेही वाचा – मुंबईत 12 दिवसांसाठी 10 टक्के पाणी कपात; ‘या’ कलावाधीत पाणी जपून वापरा

- Advertisement -

सरकारी तेल विपणन कंपन्यांकडून चार महानगरांमध्ये 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजीच्या किंमती कमी केल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. तेल कंपन्यांच्या या निर्णयामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट्स सारख्या व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅस वापरकर्त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर या कंपन्यांनी मात्र घरगुती एलपीजीच्या किमती सध्याच्या पातळीवर स्थिर ठेवल्या आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनने चार महानगरांमध्ये 19 किलोग्राम व्यावसायिक सिलिंडरच्या किरकोळ किमती 101.5 रुपयांपर्यंत वाढ केली होती. ज्यामुळे ऐन सणात झालेल्या वाढीमुळे व्यावसायिक त्रासले होते.

त्यामुळे आता 19 किलोग्राम व्यावसायिक सिलिंडरची नवी दिल्लीमधील किंमत 1 हजार 775 रुपये, कोलकातामधील किंमत 1 हजार 885 रुपये, मुंबईतील किंमत 1 हजार 728 रुपये आणि चेन्नईमधील किंमत 1 हजार 942 रुपये असणार आहे. कंपन्यांनी 15 नोव्हेंबरच्या संध्याकाळी आढावा घेतल्यानंतर व्यावसायिक एलपीजीच्या किंमती कमी केल्या आहेत. तर घरगुती वापरासाठी 14.2 किलोचा सिलिंडर मुंबईत 902.50 रुपयांना बाजारात उपलब्ध आहे. सप्टेंबर महिन्यात सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या आणि घरगुती सिलिंडरच्या दरात कपात करत सर्वांनाच दिलासा दिला होता.

- Advertisement -

परंतु, आता पुन्हा एकदा दिवाळीच्या काही दिवस आधी व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये वाढ झाल्याने सर्व व्यावसायिकांना मोठा धक्का बसला होता. कारण दिवाळीत व्यावसायिक सर्वाधिक सिलिंडर वापरतात. मात्र, अचानक झालेल्या भाववाढीमुळे व्यावसायिकांच्या खिशाला कात्री बसलेली पाहायला मिळाली. मात्र, आता दिवाळी संपताच पुन्हा एकदा या दरांमध्ये कपात करत व्यावसायिकांना दिलासा देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -