घरताज्या घडामोडीगृहिणींना दिलासा! LPG सिलेंडर झाले स्वस्त, काय आहेत नवे दर?

गृहिणींना दिलासा! LPG सिलेंडर झाले स्वस्त, काय आहेत नवे दर?

Subscribe

गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलसोबत एलपीजी (LPG) सिलेंडरच्या किमतीत वाढ होत होती. १२५ रुपयांनी सिलेंडर महागले होते. पण आता सिलेंडरची किंमत स्वस्त झाली आहे. सिलेंडरच्या दरात १० रुपयांची कपात करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन केली आहे. आजपासून हे नवे दर लागू होणार आहेत.

एलपीजी सिलेंडरचे दर काही महिन्यांपासून गगनला भिडले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसला होता. मात्र आजपासून एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात होण्याची माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर घसरल्यामुळे सिलेंडरच्या दरात कपात झाली आहे. फेब्रुवारी महिन्यातच सिलेंडरच्या किमतीत तीन वेळा एकूण १०० रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर मार्च महिन्याच्या सुरुवातील २५ रुपयांनी सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली. म्हणजे दोन महिन्यांपासून सिलेंडर १२५ रुपयांनी महागले होते. पण आता एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच सिलेंडर दर घसरले आहेत.

- Advertisement -

जेव्हा इंधनाचे दर कमी होतात त्याच्याच फायदा सिलेंडर वापरकर्त्यांना होता. कारण त्यावेळेस सिलेंडरच्या किमतीत घट होते. दर महिन्याला देशभरात १४ कोटी घरगुती सिलेंडरचा वापर केला जातो. जेव्हापासून सरकारने उज्ज्वलासारखी योजना सुरू केली, तेव्हापासून सिलेंडर वापरणाऱ्यांची संख्या वाढली. देशभरात २०१४ मध्ये एलपीजी वापरणाऱ्या संख्या ५५ टक्के होती, आता ती ९९ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.


हेही वाचा – आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक जोडण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -