LPU Controversial Audio : भगवान राम यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी; आरोपी प्राध्यापक बडतर्फ

लव्हली युनिव्हर्सिटीने निवेदन जारी करून म्हटले की, 'आम्हाला समजले आहे की, सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमुळे काही लोक दुखावले गेले आहेत. ज्यामध्ये आमचा एक फॅकल्टी सदस्य त्याचे वैयक्तिक मत मांडताना ऐकू येत आहे.

LPU Controversial Audio LPU Sacks Professor After Video Of Her Insulting Lord Ram Goes Viral Online
LPU Controversial Audio : भगवान राम यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी; आरोपी प्राध्यापक बडतर्फ

पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या एका महिला प्राध्यापिकेने भगवान रामाबद्दल अपमानजनक टिप्पणी केली. त्यावर आता विद्यापीठ प्रशासनाने कारवाई केली आहे. पंजाबच्या फगवाडा जिल्ह्यातील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी वादात सापडली आहे. युनिव्हर्सिटीच्या एका सहाय्यक महिला प्राध्यापिकेने भगवान राम यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरत कमेंट्स केल्या आहेत. यानंतर हे प्रकरण आता सोशल मीडियावर बरचं व्हायरल होत आहे.

प्रभू रामाबद्दल अपमानास्पद भाषा

युनिव्हर्सिटीच्या सहाय्यक प्राध्यापक गुरसंग प्रीत कौर यांच्या वक्तव्याचा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक युनिव्हर्सिटी आणि प्राध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. युनिव्हर्सिटी प्रशासनाकडून सहायक प्राध्यापकाला बडतर्फ करण्याची मागणी अनेकांनी लावून धरली. यानंतर युनिव्हर्सिटी प्रशासनाने शनिवारी अपशब्द भाषा वापरल्याप्रकरणी प्राध्यापकाला बडतर्फ करण्याचा आदेश जारी केला.

लव्हली युनिव्हर्सिटीने निवेदन जारी करून म्हटले की, ‘आम्हाला समजले आहे की, सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमुळे काही लोक दुखावले गेले आहेत. ज्यामध्ये आमचा एक फॅकल्टी सदस्य त्याचे वैयक्तिक मत मांडताना ऐकू येत आहे.

आरोपी प्राध्यापक नोकरीवरून बडतर्फ

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, त्यांनी व्यक्त केलेली केलेली मते ही पूर्णपणे त्यांची वैयक्तिक मते आहेत युनिव्हर्सिटी त्यापैकी कोणत्याही मतांचे समर्थन करत नाही, आम्ही नेहमीच एक धर्मनिरपेक्ष युनिव्हर्सिटी आहोत, जिथे सर्व धर्म आणि धर्माच्या लोकांना समान प्रेम आणि आदराने वागवले जाते. त्यामुळे संबंधित प्राध्यापकाला तत्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तथापि, या संपूर्ण घटनेबद्दल आम्हाला मनापासून खेद व्यक्त करतो.

प्रभू रामाबद्दल अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप

लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी प्राध्यापक गुरुसंग प्रीत कौरने भगवान राम यांच्याबद्दल अपशब्द वापरत म्हटले की, रावण चांगला माणूस होता पण रामाने त्यांची फसवणूक केली. हे प्राध्यापक इथेच थांबले नाहीत तर ते पुढे म्हणाले की, सीतेला पळवून नेण्याची योजना रावणाची नसून रामाचीच होती. असे करून रामाला त्याचा शत्रू रावणाला जाळ्यात अडकवायचे होते.