300 कोटींच्या चोरीसाठी मुंबईच्या हॅकर्सची मदत; ‘यूपी’ एसटीएफकडून टोळीचा पदार्फाश

उत्तर प्रदेश सहकारी बँकेच्या 146 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात एसटीएफने मोठी कारवाई केली आहे. एसटीएफने लोक भवनातील विभाग अधिकारी आणि टोळीचा सूत्रधार रामराज, महमुदाबादस्थित सहकारी बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक कर्मवीर आणि सायबर तज्ज्ञासह 5 जणांना अटक केली आहे.

cyber crime

उत्तर प्रदेश सहकारी बँकेच्या 146 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात एसटीएफने मोठी कारवाई केली आहे. एसटीएफने लोक भवनातील विभाग अधिकारी आणि टोळीचा सूत्रधार रामराज, महमुदाबादस्थित सहकारी बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक कर्मवीर आणि सायबर तज्ज्ञासह 5 जणांना अटक केली आहे. चारबाग येथील हॉटेल कम्फर्टमध्ये या फसवणुकीची योजना आखण्यात आली होती. तसेच, लखनौसह अनेक जिल्ह्यांमध्ये बनावट बनावटीची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आली होती. शिवाय या चोरीसाठी मुंबईतून सायबर तज्ञांना बोलावण्यात आले होते. विशेष म्हणजे या नियोजनासाठी तब्बल 1 कोटीहून अधिक रुपये खर्च करण्यात आले होते. (Lucknow city planning of up operative bank fraud was made in Lucknow hotel)

याप्रकरणी पॉलिटेक्निक चौकाजवळून या 5 जणांना अटक करण्यात आली आहे. रामराज (लोक भवनातील होम सेक्शन-15 मधील विभाग अधिकारी), रोजा (सायबर तज्ज्ञ), ध्रुव कुमार श्रीवास्तव (सायबर तज्ज्ञ), करमवीर सिंग (असिस्टंट बँक मॅनेजर), आकाश कुमार आणि भूपेंद्र सिंग अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, ध्रुव कुमार श्रीवास्तव हा या टोळीचा सुत्रधार असल्याचे एसएसपी एसटीएफने सांगितले. मे 2021 मध्ये ध्रुव हा त्याचा मित्र ज्ञानदेव पालसोबत लखनऊमध्ये आला होता. त्यानंतर आकाश कुमार आणि एका कॉन्ट्रॅक्टरची त्याच्याशी भेट झाली. त्यानंतर मुंबईतूनही काही सायबर तज्ज्ञांना बोलावण्यात आले. हे सर्वजण एका हॉटेलमध्ये राहत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, हॅकर्सनी बँक खात्यातून ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी एक डिव्हाईस बनवले होते. विशेष म्हणजे कर्मवीर सिंग आणि ज्ञानदेव पाल या दोघांनी बँकेच्या खात्यांमध्ये 8 वेळा हे डिव्हाईस बसवून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. त्यानंतर या टोळीने बँकेचे माजी व्यवस्थापक आर एस दुबे, बिल्डर गंगा सागर चौहान आणि इतरांची भेट घेतली.

त्यानंतर 15 ऑक्टोबरला आरएस दुबे, रवि वर्मा आणि ज्ञानदेव पाल यांच्यासह 15-20 लोक केडी सिंह स्टेडियमवर पोहोचले. त्यानंतर आरएस दुबे आणि रवि वर्मा यांना बँकेत पाठवण्यात आले. कारण हे लोक नियोजनानुसार, तीन ते चार महिने बँकेत सतत जात असून, कामही करत होते. विशेष म्हणजे आर एस दुबे हे बँकेचे माजी व्यवस्थापक असल्याने त्यांना बँकेत बसण्यास कोणतीही अडचण आली नाही.

कालांतराने मात्र आरएस दुबे यांनी बँकेच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने बँकेच्या कॅशियर आणि व्यवस्थापकाचा लॉगिन आयडी आणि पासवर्डही मिळवला. त्यानंतर रवी याने बँकेतील सिस्टीममध्ये कीलगर हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले आणि डिव्हाइस इन्स्टॉल केले. त्यानंतर अडीच तासांत बिल्डर गंगा सागर चौहान याच्या बँक खात्यातून त्याच्या भावासह इतर 8 खात्यांमध्ये 146 कोटी रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर सगळे नैनितालला पळून गेले.

याप्रकरणी माहिती मिळताच सायबर क्राइम हेडक्वार्टरचे एसपी त्रिवेणी सिंग आणि एएसपी सच्चिदानंद सिंग, इन्स्पेक्टर मोहम्मद मुस्लिम खान यांनी माजी बँक मॅनेजर आरएस दुबे, बिल्डर गंगा सागर चौहान आणि सायबर तज्ज्ञ सतीश यांना अटक केली. शिवाय या टोळीकडून काही हायस्कूल, मूळ गुणपत्रिका, प्रमाणपत्रे, आधारकार्ड, 8 मोबाईल फोन व इतर कागदपत्रे, 2 दुचाकी आणि एक कार जप्त करण्यात आली आहे.


हेही वाचा – ‘तिकडे देवेंद्र फडणवीस बसलेत, तुम्हाला काहीही होणार नाही’; कोल्हापुरात नितेश राणेंचे हिंदुंना आश्वासन