घरताज्या घडामोडीमाझ्या नवऱ्याची सतराशे साठ लफडी; आयपीएसच्या पत्नीचे गृहमंत्र्यांना पत्र

माझ्या नवऱ्याची सतराशे साठ लफडी; आयपीएसच्या पत्नीचे गृहमंत्र्यांना पत्र

Subscribe

आयपीएस अधिकाऱ्याचे अन्य महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला असून त्यांनी याबाबत चक्क केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे.

उत्तर प्रदेश कॅडर २००९ बॅचच्या एका आयपीएस अधिकाऱ्यावर त्याच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. आयपीएस अधिकाऱ्याचे अन्य महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला असून त्यांनी याबाबत चक्क केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. तसेच आयपीएस अधिकारी सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर असून या आयपीएस अधिकार्‍याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. तर सूत्रांनुसार, आरोपांची सत्यता तपासल्यानंतरच आयपीएस अधिकार्‍यावर कारवाई करण्यात येणार आहे.

२०१४ साली झाले होते लग्न

२०१४ साली अधिकाऱ्याचे लग्न झाले होते. तर अधिकाऱ्याची पत्नीसुद्धा केंद्रीय सेवेत अधिकारी होती. तर उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यात हा अधिकारी एसपी म्हणून कार्यरत देखील होता. दरम्यान, पत्रानुसार आयपीएसने माफीनाम्यात आपली चूक कबुल दिली होती. तर, अधिकाऱ्याच्या पत्नीने गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहित महिला आणि मुलींशी संबंधित चॅटींग, प्रवासाच्या डिटेल्ससह सर्व पुरावे सुद्धा पाठवले आहेत.

- Advertisement -

पत्नीने केलेल्या आरोपामध्ये मध्य प्रदेशच्या सीमेवरील एका जिल्ह्यातील १८ वर्षीय तरुणीचे आपल्या पतीसोबत संबंध असल्याचे उघड झाले आहे. ज्यावेळी हा आयपीएस अधिकारी त्याच जिल्ह्यात तैनात होता. त्यावेळी मुलगी आपल्या आईवडिलांसोबत एका केसच्या निमित्ताने एसपी ऑफिसमध्ये आली होती. त्या दरम्यान, या दोघांची ओळख झाली. हळूहळू त्यांचे संबंध वाढत गेले आणि अधिकाऱ्याची दुसऱ्या जिल्ह्यात बदली झाल्यानंतर सुद्धा दोघेजण सतत भेटत असल्याचे समोर आले आहे. तसेच सहकारी अधिकार्‍यांच्या पत्नींसोबतसुद्धा अवैध संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच ही बाब जेव्हा त्या आयपीएसला समजली तेव्हा त्याने आपल्या पत्नीविरूद्ध घटस्फोटासाठी केस दाखल केली आहे.

पत्नीने म्हटले आहे की, २०१८ मध्ये आम्ही त्याच्याकडून लेखी घेतले होते की भविष्यात कोणत्याही महिलेशी संबंध ठेवणार नाही. त्याने सर्व चूका मान्य करत म्हटले होते की, आता दुसर्‍या कोणत्याही महिलेशी संबंध ठेवणार नाही. परंतु, याचा त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. काही दिवसानंतर तो चंदीगढच्या मुलीसोबत पकडला गेला.

- Advertisement -

हेही वाचा – मांडीवर Suicide Note लिहून महिलेने केली आत्महत्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -