Homeक्राइमLucknow Murder : आरोपी अर्शदने का केली बहिणींची अन् आईची हत्या? लखनऊ...

Lucknow Murder : आरोपी अर्शदने का केली बहिणींची अन् आईची हत्या? लखनऊ घटनेचे धक्कादायक कारण

Subscribe

लखनऊमधील शरणजीत हॉटेलमध्ये राहण्यासाठी आलेल्या एका कुटुंबातील 24 वर्षीय मोहम्मद अर्शद आणि त्याच्या वडिलांनी मिळून घरातील पाच महिलांचा म्हणजेच आरोपी अर्शदची आई आणि चार बहिणींची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरुवातीला कौटुंबिक कलहातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. परंतु, घटनेच्या काही तासांनंतर अर्शदने त्याच्या आईची आणि बहिणींची हत्या का केली? याचे कारण समोर आले आहे.

लखनऊ : एकीकडे नववर्षाचे जोरदार स्वागत होत असताना दुसरीकडे मात्र पाच जणांच्या हत्येमुळे उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये खळबळ उडाली आहे. लखनऊमधील शरणजीत हॉटेलमध्ये राहण्यासाठी आलेल्या एका कुटुंबातील 24 वर्षीय मोहम्मद अर्शद आणि त्याच्या वडिलांनी मिळून घरातील पाच महिलांचा म्हणजेच आरोपी अर्शदची आई आणि चार बहिणींची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरुवातीला कौटुंबिक कलहातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. परंतु, घटनेच्या काही तासांनंतर अर्शदने त्याच्या आईची आणि बहिणींची हत्या का केली? याचे कारण समोर आले आहे. पण अर्शदने सांगितलेल्या कारणानुसार या हत्येमागे खरंच ते कारण आहे की अजून काही कारण आहे, याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. (Lucknow Murder Why did the accused Arshad kill his sisters and mother?)

उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमधील शरणजीत हॉटेलमध्ये बुधवारी (ता. 01 जानेवारी 2025) सकाळी एका खोलीत पाच मृतदेह मिळाले. या मृतदेहांसोबतच त्यांची हत्या करणार अर्शद सुद्धा बसला होता. अर्शदनेच त्याची आई अस्मा आणि चार बहिणी आलिया (वय वर्षे 09), अलशिया (वय वर्षे 19), अक्सा (वय वर्षे 16) आणि रहमीन (वय वर्षे 18) यांची निर्घृणपणे हत्या केली. या हत्येच्या घटनेची माहिती तत्काळ डीसीपी रवीना यांना देण्यात आली. त्यांनी आपल्या पथकासह आरोपीला अटक केली. सुरुवातीला आरोपीची चौकशी केली असतान कौटुंबिक कलहातून हे हत्याकांड घडल्याचे समोर आले. पण आता काही तासांनीच या हत्याकांडाबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील अर्शदचे वडील ज्यांच्या या हत्येमध्ये सहभाग आहे, ते फरार झाले आहे. पण ही हत्या केल्यानंतर अर्शदने एक व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर टाकला आहे, ज्यामध्ये त्याने शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणानंतर हे धक्कादायक पाऊल उचलले असल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा… Lucknow Crime : नववर्षाच्या पहिल्या दिवशी लखनऊ हादरले, हॉटेलमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या

आरोपी मोहम्मद अर्शद याने वडिलांच्यासोबत आईची आणि बहिणींची हाताची नस कापली. यानंतर त्याने त्यांचा गळा आवळला. पण तो इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने एक व्हिडीओ बनवला. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने असे का केले? याचे कारण सांगितले. अर्शद याने त्याच्या परिसरातील लोकांना वैतागून हे पाऊल उचलल्याचे व्हिडीओमध्ये म्हटले आहे. त्यामुळे या घटनेसाठी मी ज्या ज्या लोकांची नावे घेत आहे, त्या सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणी अर्शदने व्हिडीओच्या माध्यमातून केली. तर आम्हा कुटुंबियांना धर्मपरिवर्तन करायचे होते. पण ते करता आले नाही, आम्ही अनेकांकडून मदत मागितली. परंतु, ती मदत सुद्धा मिळाली नाही आणि त्यामुळे आता आमच्या घराची जागा ही मंदिरासाठी दान करण्यात यावी, त्याशिवाय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणी आरोपी मोहम्मद अर्शद याने व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे.

अर्शदने व्हिडीओमध्ये काय म्हटले आहे?

माझे नाव मोहम्मद अर्शद आहे. कॉलनीतील लोकांमुळे आणि त्यांना कंटाळून आज मी हे पाऊल उचलले आहे. आज मी माझ्या आईला आणि बहिणींना स्वतःच्या हातांनी मारले आहे. पोलिसांना हा व्हिडीओ मिळाल्यावर त्यांना लगेच कळेल की या सगळ्याला कॉलनीतील लोकच जबाबदार आहेत. आमचे घर हिसकावण्यासाठी कॉलनीतील काही लोकांनी आजवर आमच्यावर खूप अत्याचार केले. आम्ही याविरोधात आवाजही उठवला. मात्र आजपर्यंत आमचे कोणीही ऐकले नाही. त्यामुळेच गेल्या 10 ते 15 दिवसांपासून आम्ही फूटपाथवर झोपावे लागत आहे. आम्ही कुडकुडत्या थंडीत भटकत आहोत. त्या लोकांनी आमचे घर हिसकावून घेतले आहे. पण आमच्याकडे आमच्या घराची कागदपत्रे आहेत आणि आम्हाला आमचे घर हे मंदिर बनविण्याकरिता दान करायचे होते. आम्ही हिंदू धर्मात येऊ इच्छित होतो.

लखनऊ पोलिसांना हा व्हिडीओ मिळताच आमची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती आहे की, आमच्यावर अत्याचार करणाऱ्या मुसलमानांना सोडू नका. तुम्ही जे काही करत आहात ते खूप चांगले करत आहात. हे मुसलमान सर्वत्र जमिनी बळकावतात आणि लोकांवर अत्याचार करतात. ते कोणत्या प्रकारचे काम करतात ते माहित नाही. पण ते बनावट नोटांचा व्यवसाय करतात. आमच्यावर अत्याचार करणाऱ्या लोकांवर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही बराच प्रयत्न केला. पण आम्ही ते करू शकलो नाही आणि आमच्या मृत्यूला संपूर्ण कॉलनी जबाबदार असून मुख्य लोकांमध्ये राणू उर्फ ​​आफताब अहमद, अलीम खान, सलीम ड्रायव्हर, अहमद, आरिफ, अझहर आणि त्यांचे नातेवाईक. तो ऑटो चालवतो आणि त्याच्या गल्लीत नातेवाईकही राहतात, असा आरोप केला आहे.

हे लोक एक मोठी भूमाफिया टोळी चालवतात. यामध्ये मुलींची विक्री केली जाते. खोट्या आरोपाखाली आम्हाला (वडील आणि अर्शद) तुरुंगात पाठवायचा यांचा प्रयत्न होता. त्यानंतर आमच्या बहिणींना हैदराबादमध्ये विकायचे, अशी या लोकांची योजना होती. आमच्या घरासमोर एक व्यक्ती राहतो, त्याला माझ्या बहिणी विकायच्या होत्या. पण भाऊ म्हणून आम्हाला हे नको होते, म्हणून आज (ता. 31 डिसेंबर 2024) दुपारी 2 वाजता मी माझ्या बहिणींचा गळा दाबून आणि त्यांच्या हाताच्या नसा कापून त्यांची हत्या केली, असे म्हणत अर्शदने त्याच्या मृत बहिणींचा आणि आईचा व्हिडीओमध्ये चेहरा दाखवला आहे.