नवाबांची नगरी ‘लखनऊ’ शहराच्या नावात होणार बदल? सीएम योगींच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

याआधीही अलाहाबादचे नाव प्रयागराज आणि फैजाबादचे नाव अयोध्या झाले आहे.

lucknow name change cm yogi adityanath modi
नवाबांची नगरी 'लखनऊ' शहराच्या नावात होणार बदल? सीएम योगींच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. य दोन्ही नेत्यांनी लखनऊमध्ये बैठक घेतली आणि त्यानंतर सर्व मंत्र्यांसोबत डिनरही केला, मात्र योगींच्या या भेटीनंतर त्यांच्या ट्विटने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या ट्विटनंतर आता उत्तर प्रदेशातील नवाबांचे शहर असलेल्या लखनऊचे नाव बदलणार असल्याचे अंदाज बांधले जात आहेत.

दरम्यान पंतप्रधान मोदींचे स्वागत करताना सीएम योगींनी ट्विट करत लिहिले की, लखनऊमघील शेषावतार भगवान श्री लक्ष्मणजींच्या पवित्र नगरीमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आणि अभिवादन आहे. या ट्विटमध्ये त्यांनी जरी नाव बदलण्याचे कोणतेही संकेत दिले नसले तरी सोशल मीडियावर नाव बदलाच्या चर्चांना उधाण आले आहे.

सीएम योगींनी लक्ष्मणाची पवित्र नगरी असा उल्लेख केल्याने सट्टेबाजार चांगलाच तापला आहे. काहींनी तर नव्या नावांचाही विचार केला असून लक्ष्मणपुरीपासून ते लक्ष्मणनगरपर्यंत अनेक नावं सुचवली आहे. मात्र अद्याप सरकारने किंवा कोणत्याही मंत्र्याने अशी कोणतीही घोषणा किंवा शक्यता व्यक्त केलेली नाही.

मात्र अनेक प्रसंगी उत्तरप्रदेश राज्यातील योगी सरकारने अशाप्रकारे अनेक ठिकाणांची नावे बदलली आहेत.
यात रस्ते, चौक, मोहल्ला, विमानतळाची नावेही बदलण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय नैनी परिसराचे नाव बदलून अटलबिहारी बाजपेयी नगर तसेच विमानतळाचे नाव पंडित दीनदयाळ उपाध्याय विमानतळ आणि ओव्हर ब्रिजचे नाव श्यामा प्रसाद मुखर्जी असे करण्यात आले. या ठिकाणांच्या नावांच्या उच्चारात अडचण आल्याने त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

याआधीही अलाहाबादचे नाव प्रयागराज आणि फैजाबादचे नाव अयोध्या झाले आहे. आणखी बर्‍याच शहरांबद्दल अशी माहिती समोर येत आहे की, सरकार लवकरच त्यांचे नाव बदलू शकते. आता या सर्व शक्यतांमुळे सीएम योगींच्या ट्विटने लखनऊचे नामकरण करण्याच्या प्रक्रियेला शह दिला आहे.


Hypersonic Missile: अमेरिकेत हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, यूएस सैन्याच्या क्षमतेमध्ये वाढ